सिंहगड घाट रस्ता आजपासून तीन महिने दुरुस्तीसाठी बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 03:00 PM2018-12-11T15:00:17+5:302018-12-11T15:01:37+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या कामांची सुरूवात करण्यात आल्यामुळे आता पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

Sinhagad Ghat road has been closed for three months from today | सिंहगड घाट रस्ता आजपासून तीन महिने दुरुस्तीसाठी बंद 

सिंहगड घाट रस्ता आजपासून तीन महिने दुरुस्तीसाठी बंद 

Next
ठळक मुद्देपाच कोटीचा निधी मंजूर होवूनही वर्षांपासून रस्ता दुरुस्तीचे काम होते रखडले

पुणे : काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने सिंहगड घाट रस्ता आजपासून तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. पाच कोटीचा निधी मंजूर होवूनही वर्षांपासून रस्ता दुरुस्तीचे काम रखडले होते. लोकमतने या कामाचा वेळोवेळी पाठपुरावा देखील केला होता. आता पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या कामांची सुरूवात करण्यात आली असून वन विभाग आणि वनसंरक्षण समितीचे वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रस्ता तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Web Title: Sinhagad Ghat road has been closed for three months from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.