खेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार! ७५ वर्षांच्या सासऱ्याने सुनेवर केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 04:23 PM2021-06-17T16:23:22+5:302021-06-17T16:23:30+5:30

सुनेवर हल्ला केल्यानंतर दुचाकीवरून पळून गेलेला सासरा पुणे नाशिक महामार्गावर चाकण मध्ये रस्त्यालगत बेशुद्धावस्थेत मिळून आला

Shocking type in Khed taluka! The 75-year-old father-in-law attacked a women | खेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार! ७५ वर्षांच्या सासऱ्याने सुनेवर केले सपासप वार

खेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार! ७५ वर्षांच्या सासऱ्याने सुनेवर केले सपासप वार

Next
ठळक मुद्देसून गच्चीत कपडे वाळत घालायला गेली असता मान, हात, गाल आणि पायावर लोखंडी सुरीने सपासप वार केले

चाकण: माझ्या घरात कशी राहते, असे म्हणत चिडलेल्या ७५ वर्षीय सासऱ्याने ३५ वर्षीय सुनेवर लोखंडी सुरीने सपासप वार केल्याचा धक्कादायक प्रकार  खेड तालुक्यातील संतोषनगरला घडला आहे. सुनेवर हल्ला केल्यानंतर दुचाकीवरून पळून गेलेला सासरा पुणे नाशिक महामार्गावर चाकण मध्ये रस्त्यालगत बेशुद्धावस्थेत मिळून आला. सासरा आणि सून या दोघांवरही चाकण मधील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पोलिसांना घटनास्थळी लाकडी मुठीची लांब पात्याची सुरी मिळाली आहे. 

राधिका मोरेश्वर येवले ( वय - ३५ वर्षे, रा.संतोषनगर ) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनेचे नाव आहे. या प्रकरणी सासरा पुरुषोत्तम दगडू येवले ( वय - ७५ वर्षे ) याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधिका आणि पुरुषोत्तम यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होते. राधिका हिला घरात राहूच द्यायचे नाही, या कारणावरून तिला पुरुषोत्तम हे त्रास देत होता. बुधवारी सकाळी राधिका ही घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती. त्यावेळी पुरुषोत्तम सुनेला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पाठलाग करत गच्चीत गेला. तिच्या मान, हात, गाल आणि पायावर लोखंडी सुरीने सपासप वार केले. या हल्ल्यात राधिका या गंभीर जखमी झाल्या. सासऱ्याच्या तावडीतून सुटत राधिका गच्चीवरून खाली धावत आल्या. तिच्या पाठोपाठ तो देखील धावत आला. आणि दुचाकीवरून पसार झाला.

परिसरातील नागरिकांनी तातडीने गंभीर जखमी असलेल्या राधिका यांना चाकण येथे रुग्णवाहिकेतून पाठवले. मात्र पुणे नाशिक महामार्गावर रस्त्यात पुरुषोत्तम देखील बेशुद्धावस्थेत पडलेला दिसून आला. सासरा आणि सून या दोघांनाही चाकण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाकण पोलीस या बाबत अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Shocking type in Khed taluka! The 75-year-old father-in-law attacked a women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app