धक्कादायक! लिव इनमध्ये राहणाऱ्या तरुणीचा चारित्र्याच्या संशयावरून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 13:01 IST2021-04-23T13:00:02+5:302021-04-23T13:01:43+5:30

तरुण स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

Shocking! Murder of a young woman living in a live-in on suspicion of character | धक्कादायक! लिव इनमध्ये राहणाऱ्या तरुणीचा चारित्र्याच्या संशयावरून केला खून

धक्कादायक! लिव इनमध्ये राहणाऱ्या तरुणीचा चारित्र्याच्या संशयावरून केला खून

ठळक मुद्देदोघे मागील ७ ते ८ महिन्यांपासून लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते

वाघोली : लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने १७ वर्षीय तरुणीचा चारित्र्याच्या संशयावरून केबलच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पेरणेफाटा परिसरातील लक्ष्मीनगर परिसरामध्ये घडली आहे.  खून केल्यानंतर तरुण स्वतःहून लोणीकंद पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

सागर सारंगधर वानखडे (वय, २८) असे खून करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो एका १७ वर्षीय तरुणीबरोबर मागील ७ ते ८ महिन्यांपासून लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. तरुणीचे इतरांबरोबर अनैतिक संबंध आहे असे चारित्र्याचा संशय घेऊन दोघांमध्ये वाद देखील झाले होते. रागाच्या भरात त्याने केबलच्या सहाय्याने राहत्या घरात तरुणीचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

Web Title: Shocking! Murder of a young woman living in a live-in on suspicion of character