शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

लॉज, फार्म हाऊसवर आश्रय, आर्थिक मदत; सुशील आणि राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्यांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:27 IST

गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली होती, या सर्वांना आता 25 हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन आला

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. त्यांनी पलायन केले त्यावेळी त्यांना काही जणांनी मदत केली. याप्रकरणी प्रीतम वीरकुमार पाटील, मोहन उर्फ ​​बंडू उत्तम भेगडे, बंडू लक्ष्मण फाटक, अमोल विजय जाधव, राहुल दशरथ जाधव या पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना पुणेन्यायालयानेन्यायालयीन कोठडी सुनावली होती. गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली होती. या सर्वांना आता 25 हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

वैष्णवी हगवणे (वय २३) हिने मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी १७ मे रोजी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा आपला मुलगा सुशील याच्यासह पसार झाला होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी अनेक वाहने बदलून फार्म हाउस आणि लाॅजवर आश्रय घेतला. त्यासाठी अनेक जणांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पितापुत्राला मदत केली. त्यांना आर्थिक मदत करून आश्रय देखील दिला. त्यामुळे पोलिसांना चकवा देणे त्यांना शक्य झाले. सात दिवसानंतर त्यांना पुण्यातील स्वारगेट येथून अटक करण्यात आली. दरम्यान त्यांनी वडगाव मावळ, लोणावळा, सातारा तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आश्रय घेतल्याचे समोर आले आहे. त्यावरून पोलिसांनी संशयितांना आश्रय देणाऱ्या पाच जणांना अटक  करण्यात आली होती. 

पाचही जण राजकीय पदाधिकारी 

प्रीतम पाटील हा कर्नाटकातील माजी उर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे. वीरकुमार पाटील हे २८ वर्षे काँग्रेसचे आमदार होते. बंडू लक्ष्मण फाटक हा मुळशी तालुक्यातील शिरोली चांदोली या गावाचा माजी सरपंच आहे. मोहन उर्फ ​​बंडू उत्तम भेगडे हा वडगाव मावळ ग्रामपंचायतीचा माजी सदस्य व भाजपचा वडगाव मावळ शहराचा माजी अध्यक्ष आहे. बंडू भेगडे याची पत्नी मंगल भेगडे या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. पुसेगाव येथील अमोल जाधव आणि राहुल जाधव हे शेतकरी असून त्यांच्याकडे हगवणे यांनी बैल सांभाळण्यासाठी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसCourtन्यायालयPoliticsराजकारणMONEYपैसा