पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून दिले; गंभीर जखमी होऊन मृत्यू, सासरच्या छळामुळे महिलेने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:59 IST2026-04-15T15:58:51+5:302026-04-15T15:59:38+5:30

गंभीररीत्या भाजलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला

She poured petrol on herself and set herself on fire; died after being seriously injured, the woman took extreme steps due to her in-laws' harassment | पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून दिले; गंभीर जखमी होऊन मृत्यू, सासरच्या छळामुळे महिलेने उचलले टोकाचे पाऊल

पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून दिले; गंभीर जखमी होऊन मृत्यू, सासरच्या छळामुळे महिलेने उचलले टोकाचे पाऊल

पुणे : छळामुळे एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची घटना कात्रज भागात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सासऱ्यासह दिराविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेच्या बहिणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, सासरे हनुमंत काळे आणि दीर रतन (रा. वंडरसिटी सोसायटीजवळील झोपडपट्टी, कात्रज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सासरे आणि दीर महिलेचा छळ करत होते. लाकडे फोडण्याच्या कारणावरून तिला शिवीगाळ करण्यात आली होती. दि. ११ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अंगावर बाटलीत भरलेले पेट्रोल ओतले. पेट्रोल ओतून पेटवून घेतले. गंभीररीत्या भाजलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या बहिणीने मंगळवारी (दि. १४) पोलिसांकडे तक्रार दिली. सासरे आणि दिराच्या छळामुळे आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश मोहिते करत आहेत.

Web Title : उत्पीड़न से तंग आकर महिला ने की आत्महत्या, ससुराल वाले गिरफ्तार

Web Summary : पुणे: कटराज में उत्पीड़न से तंग आकर एक महिला ने खुद को आग लगा ली, जिससे उसकी मौत हो गई। पुलिस ने ससुर और देवर के खिलाफ मामला दर्ज किया है। पीड़िता की बहन ने लगातार प्रताड़ना का आरोप लगाया है।

Web Title : Woman self-immolates due to harassment; dies, in-laws booked.

Web Summary : Pune: A woman in Katraj died after setting herself on fire due to alleged harassment by her father-in-law and brother-in-law. Police have registered a case based on the sister's complaint, alleging constant abuse that led to the suicide.