पिंपरी : नक्षलवादी विचारसरणीचे उदातीकरण करणे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) सोशल मीडिया सेल प्रदेशाध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. पिंपरी -चिंचवड सायबर पोलिसांनी ही कारवाई केली. ही घटना ३ ते २० एप्रिल या कालावधीत ऑनलाइन घडली आहे.
महादेव विलास बालगुडे (वय ४०, रा. बारामती, जि. पुणे), असे अटक केलेल्याचे नाव आहे. ॲड. बसवराज मल्लिकार्जुन यादवाड (रा. पुणे) यांनी याप्रकरणी २२ एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर सायबर पोलिसांनी संशयित बालगुडे याला शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित बालगुडे याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने त्यांचा फोटो मार्क करून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करून चिथावणी देऊन सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हिंसा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तसेच नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ व त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
Web Summary : NCP social media head arrested for pro-Naxal posts and defaming CM Fadnavis online. Police allege attempts to incite violence and disturb public peace. Court grants police custody.
Web Summary : एनसीपी सोशल मीडिया प्रमुख नक्सल समर्थक पोस्ट और सीएम फडणवीस को बदनाम करने के आरोप में गिरफ्तार। पुलिस ने हिंसा भड़काने और शांति भंग करने की कोशिश का आरोप लगाया। न्यायालय ने पुलिस हिरासत মঞ্জুর की।