शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ल्याची कबुली; टिंगरेवर हल्ला करणा-या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 19:17 IST

विधानसभेला वडगाव शेरीत माजी नगरसेविका रेखा टिंगरेंचे पती चंद्रकांत टिंगरेंनी भाजप मधून शरद पवार गटात प्रवेश केला होता

चंदननगर: विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना  राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार पक्षात प्रवेश करणारे चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (अजित पवार गट) शरद पवार पक्षात प्रवेश केल्याने आरोपींनी दगडफेक केल्याचा कारण पुढे आला आहे.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी  रेवण तानाजी लगस (वय.२०, रा.गोकुळ नगर,कात्रज) प्राणजीत अच्युत शिंदे (वय.२४, रा. हांडेवाडी)  अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी  माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी फिर्याद दिली होती.

धानोरी प्रभागाच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत टिंगरे दांपत्याने महायतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना पाठिंबा दिला होता. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करून बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा जाहीर केला होता.

चंद्रकांत टिंगरे आणि त्यांचे चालक १९ नोव्हेंबर रोजी धानोरी महावितरण कार्यालय समोर गाडीत बसले असताना दोघांनी गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर दगडफेक करून मारहाण केली ,अशी तक्रार रेखा टिंगरे यांनी दिली होती. महायुतीचे उमेदवार आणि आमदार सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझे पतीवर जीवघेणा हल्ला केल्याचा थेट आरोप रेखा टिंगरे यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. आज विश्रांतवाडी पोलिसांनी  दोन आरोपींना  अटक केली.

विधानसभा निवडणुकीत दुस-या पशात प्रवेश केल्याचा राग मनात धरून दगडफेक केल्याचे आरोपींच्या चौकशीत समोर आले. -कांचन जाधव,वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस ठाणे

टॅग्स :Puneपुणेsunil tingreसुनील टिंगरेMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliceपोलिसvadgaon-sheri-acवडगाव शेरी