शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारवाडा परिसराला आली अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:20 IST

पुणे : शहराच्या ऐतिहासिक ठेव्यांपैकी एक असलेल्या शनिवारवाडा परिसराला अक्षरश: अवकळा आली. पालिकेच्या उदासीन कारभारामुळे वाड्याच्या भितींलगत असलेल्या मोकळ्या ...

पुणे : शहराच्या ऐतिहासिक ठेव्यांपैकी एक असलेल्या शनिवारवाडा परिसराला अक्षरश: अवकळा आली. पालिकेच्या उदासीन कारभारामुळे वाड्याच्या भितींलगत असलेल्या मोकळ्या जागांमध्ये कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर, दुसऱ्या बाजूला पदपथ अतिक्रमणांनी व्यापला असून जागोजाग पथारीधारकांनी गर्दी केल्याने शनिवारवाड्याचे ऐतिहासिक सौंदर्य झाकले जात आहे. नैमित्यिक स्वच्छता आणि अतिक्रमण कारवाईकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मराठेशाहीचे पेशवे असलेल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेल्या शनिवारवाड्याची प्रशासनाकडून एकप्रकारे अवहेलना सुरु असल्याचे चित्र आहे. पुण्यामध्ये पर्यटनासाठी तसेच सहलींसाठी आलेल्या पर्यटक, अभ्यासक, विद्यार्थ्यांना शनिवारवाड्याचे आकर्षण असते. वाड्यामधून फिरत असताना खाली पाहिल्यावर चहूबाजूला केवळ घाण, कचरा पडलेला दिसतो. आसपासचे व्यापारी तसेच नागरिक त्यांच्या दुकानांमधील आणि घरातील कचरा या ठिकाणी आणून टाकत आहेत. वाड्याच्या भिंतीपासून काही अंतरावर सुरक्षेकरिता लोखंडी जाळ्या बसविलेल्या आहेत. परंतु, या जाळ्यांना गेट ठेवलेले आहेत. त्यांना कुलूप नाही की कोणत्या स्वरुपाची सुरक्षा आहे.

कचरा टाकण्यासोबतच या ठिकाणी हिरवळीवर बसून मद्यपान तसेच नशा करण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे पादचारी नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वाड्याच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे. यामध्ये बंदी असलेले थर्माकोल टाकलेले आहे. पश्चिम बाजूला असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या खोलीला कुलूप नसल्याने आतमध्ये मद्यपी आणि गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. बाजीराव पेशवे पुतळ्याजवळ विद्युत खांब आणि अन्य राडारोडा पडलेला आहे. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य लोपले आहे.

====

बेकायदेशीरपणाने दुकाने थाटली

वाड्याच्या पूर्व बाजूला असलेल्या भिंतीलगतच्या पदपथावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. जागोजाग बेकायदेशीरपणाने दुकाने थाटण्यात येत आहेत. भविष्य सांगणाऱ्यांपासून ते मोबाईलच्या अ‍ॅक्सेसरीज विकण्यापर्यंतच्या सर्व वस्तू या ठिकाणी मिळत आहेत. पालिकेकडून अधूनमधून केवळ जुजबी कारवाई केली जाते. त्यानंतर, चित्र पुन्हा जैसे थे असेच होते. यामुळे पादचाऱ्यांना नाईलाजास्तव रस्त्यावरुन चालत जावे लागते.

फोटो : तन्मय