शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

Junnar Taluka: कुकडी डाव्या कालव्यात पडलेल्या नव दाम्पत्याचा शोध; ४० तासांनी मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:52 IST

सोमवारी सायंकाळी काळवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कालव्याच्या पुलाजवळ काही नागरिकांना एक लहान बालक कालव्याच्या कडेला उभे राहून आई-वडिलांना हाका मारताना दिसले

आळेफाटा : येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्यात पडून उंब्रज येथील अक्षय यशवंत शिंगोटे (वय २८) व प्राजक्ता अक्षय शिंगोटे (वय २५) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ३०) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर तब्बल ४० तासांनी बुधवारी (दि. १) सकाळी सुमारे १० वाजता लेंडेस्थळ येथे दोघांचेही मृतदेह आढळले. सोमवारी सायंकाळी काळवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कालव्याच्या पुलाजवळ काही नागरिकांना एक लहान बालक कालव्याच्या कडेला उभे राहून आई-वडिलांना हाका मारताना दिसले. नागरिकांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेतली असता, तेथे चप्पल आढळली. कालव्याकडे लक्ष दिल्यावर संबंधित दाम्पत्य पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूरपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र यश आले नाही. त्यानंतर बोटीच्या सहाय्याने शोधकार्य सुरू ठेवण्यात आले, परंतु कालव्यातील तीव्र प्रवाहामुळे अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान, उंब्रज व काळवाडी गावचे सरपंच हिरामण शिंगोटे, तुषार वामन तसेच उंब्रजचे पोलिस पाटील राहुल हांडे आणि ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडे कालव्यातील पाणी कमी करण्याची मागणी केली. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली. आळेफाटा पोलिस ठाण्याकडूनही याबाबत पत्र देण्यात आले होते. अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांनी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जुन्नर येथील शिवनेरी रेस्क्यू टीमच्या दहा सदस्यांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. घटनेच्या ठिकाणापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर लेंडेस्थळ येथे दोघांचेही मृतदेह सापडले. यानंतर पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, पोलिस कर्मचारी व पोलिस पाटील राहुल हांडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Junnar: Newlyweds Found Dead in Kukadi Canal After 40-Hour Search

Web Summary : A young couple tragically drowned in the Kukadi canal near Yedgaon Dam. After a 40-hour search, their bodies were recovered. Locals demanded the water be stopped to aid the rescue, leading to the discovery near Lendesthal.
टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसriverनदीWaterपाणीDeathमृत्यू