समीर वानखेडेचा बाप बोगस, घरातलेही बोगस; तो तुरुंगात जाणार हे निश्चितः नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 07:21 PM2021-10-21T19:21:33+5:302021-10-21T19:27:18+5:30

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले, येत्या वर्षभरात त्याची (समीर वानखेडे) नोकरी जाईल, बोगसगिरीचे पुरावे सादर केल्यानंतर तो एक दिवसही नोकरीत राहू शकत नाही

sameer wankhede father and his family bogus said nawab malik | समीर वानखेडेचा बाप बोगस, घरातलेही बोगस; तो तुरुंगात जाणार हे निश्चितः नवाब मलिक

समीर वानखेडेचा बाप बोगस, घरातलेही बोगस; तो तुरुंगात जाणार हे निश्चितः नवाब मलिक

Next

पुणेे: मागील काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर याची सुरवात झाली. आता राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे  नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये सभेत बोलताना मलिक यांनी समीर वानखेडेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. समीर वानखेडेचा बाप बोगस, तो स्वतः बोगस तसेच त्याच्या घरातले बोगस आहेत, असं वक्तव्य मलिक यांनी सभेत केलं.

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले, येत्या वर्षभरात त्याची (समीर वानखेडे) नोकरी जाईल, बोगसगिरीचे पुरावे सादर केल्यानंतर तो एक दिवसही नोकरीत राहू शकत नाही. आगामी काळात त्याचा तुरुंगवास निश्चित आहे. आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी पुढे आलेल्या समीर वानखेडेचा तुरुंगवास या देशातील जनता पाहील. 

समीर वानखेडे बोगस असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आगामी काळात त्याच्याविरुध्दचे पुरावे आम्ही काढणार आहोत, असं वक्तव्य मलिक यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ येथे जाहीर सभेत केले. यामुळे राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे.

Web Title: sameer wankhede father and his family bogus said nawab malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app