शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पुण्यात विधानपरिषदेला भाजपात एकदाच बंडखोरी अन् पराभव; बंडखोरीला थारा नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 14:04 IST

पक्षाचा आदेश डावलून कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्याने बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची परंपरा पुण्याला नाही

पुणे : विधानसभा निवडणूक सुरू आहे, आता दिवाळीनंतर प्रचाराला जोर येईल. पुणे त्याला अपवाद नाही. पुणे शहराला राजकारणात भाऊबंदकीचा इतिहास आहे, पण बंडखोरीचा नाही. विधानपरिषदेच्या एका जागेसाठी भारतीय जनता पक्षात १९९० ला एकदाच बंडखोरी झाली होती आणि त्यात बंडखोराचा पराभव झाला होता.

पक्षबदलही अलीकडचाच

पक्षाचा आदेश डावलून कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्याने बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची परंपरा पुण्याला नाही. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश घेत निवडणूक लढण्याचा प्रकारही अगदी अलीकडचा आहे. सन १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत मोहन धारिया जनता पक्षाकडून खासदार झाले, त्याआधी ते काँग्रेसकडून निवडून आले होते, पण तो आणीबाणीच्या वावटळीतील पक्षबदल होता.

विधानपरिषेदेला बंड

सन १९९० मध्ये विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून भाजपने प्रकाश जावडेकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्याआधी नारायण वैद्य या जागेवरूनच आमदार झाले होते. पक्ष आपल्याला उमेदवारी देईल या खात्रीत ते होते. मात्र, पक्षाने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. वैद्य बंडखोरी करून उभे राहिले, पण त्यांचा पराभव झाला. जावडेकर प्रथमच आमदार झाले. पक्षाने सगळी यंत्रणा त्यांच्या मागे उभी केली. बंडखोर वैद्य यांना फार प्रतिसाद मिळाला नाही.

नाव घ्यावी अशी बंडखोरी नाही

बाकी १९५२ च्या निवडणुकीपासून पुण्यात विधानसभेच्या निवडणुकीला नाव घ्यावे अशी फार मोठी बंडखोरी झालेली दिसत नाही. काँग्रेस, कम्युनिस्ट, जनसंघ, हिंदुमहासभा हे प्रमुख राजकीय पक्ष होते. काँग्रेसचे वर्चस्व होते. कम्युनिस्ट त्यांच्याबरोबर स्पर्धा करत. ती इतकी जोरदार असायची की संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कम्युनिस्ट उमेदवाराने १९५७ च्या निवडणुकीत तोपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला कसबा विधानसभा मतदारसंघ हिसकावला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचे त्यावेळी वारे होते, पण त्यावेळीही समितीमध्ये किंवा काँग्रेस वा अन्य पक्षांमध्ये बंडखोरी झाली नव्हती.

आठवणीत राहावी अशी बंडखोरी पुण्यात झालेली नाही. जिल्ह्यात एखादा अपवाद असू शकेल. याचे कारण पक्षनिष्ठेला महत्त्व, नेत्यांविषयी प्रचंड आदर हेच होते. नेत्यांचे नैतिक वजनच इतके होते की, त्यांचा फोन तर दूरच, पण निरोप आला तरी बंडाची भाषा करणारे गार होत असत. - उल्हास पवार, माजी आमदार, काँग्रेस

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस