हडपसरच्या कामधेनू इस्टेटमधील हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या बॉम्बचे धागेदोरे मांजरीत?; पोलिसांचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 23:51 IST2026-05-14T23:49:26+5:302026-05-14T23:51:02+5:30

मांजरीत पोलिसांनी छापे टाकले असून,  दहशतवादी विरोध पथकासह अनेक यंत्रणा मांजरीत दाखल झाल्या आहेत.

pune police raid at manjari area about bomb found at hospital in Kamdhenu Estate Hadapsar | हडपसरच्या कामधेनू इस्टेटमधील हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या बॉम्बचे धागेदोरे मांजरीत?; पोलिसांचे छापे

हडपसरच्या कामधेनू इस्टेटमधील हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या बॉम्बचे धागेदोरे मांजरीत?; पोलिसांचे छापे

 लोकमत न्यूज नेटवर्क, पुणेहडपसरच्या कामधेनू इस्टेट मधील हॉस्पिटल मध्ये ठेवलेल्या बॉम्ब ठेवल्याने शहरात खळबळ उडाली असून, पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. मांजरी येथील घावटे वस्ती येथे असणाऱ्या मोबाईल शॉप वर पोलिसांनी गुरुवारी उशीरा छापा टाकला. मात्र पोलिस येथे जाण्याआधी संशयित फरार झाला. 

मांजरीत पोलिसांनी छापे टाकले असून,  दहशतवादी विरोध पथकासह अनेक यंत्रणा मांजरीत दाखल झाल्या आहेत. एका मोबाईल शॉप वर पोलिसांनी छापा टाकला असता संशयित फरार झाला आहे. काही आक्षेपार्ह  वस्तू तेथे सापडल्याचे सूत्राकडून माहिती मिळत आहे. हा परिसर सील केला असून पोलीस तपास करीत आहेत.

स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत

हडपसर येथील कामधेनु इस्टेट मधील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉस्पिटलमध्ये बॉम्ब मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अद्याप हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणारा व्यक्ती पोलिसांना मिळून आलेला नाही. हॉस्पिटल आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेच पोलिसांनी ताब्यात घेतले असून, स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

दरम्यान, पोलिसांचा तपास विविध अँगलने सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला दुचाकीस्वार स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला व त्याच्या नातेवाईकांना ही बाब समजली. त्यानंतर त्याने पोलिसांसमोर हजर होत आपली बाजू मांडली. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. 
 

Web Title : हडपसर अस्पताल में बम की दहशत: मांजरी लिंक संदिग्ध; पुलिस छापा

Web Summary : हडपसर अस्पताल में बम की दहशत के बाद मांजरी में दुकान पर छापा। पुलिस के पहुंचने से पहले संदिग्ध फरार। जांच जारी, इलाका सील। पुलिस को सुराग की तलाश।

Web Title : Hadapsar Hospital Bomb Scare: Manjari Link Suspected; Police Raid

Web Summary : Bomb scare at Hadapsar hospital leads to Manjari shop raid. Suspect fled before police arrival. Investigation ongoing, area sealed. Police seek leads.