शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

Video : उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी : हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 19:21 IST

- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी,

पुणे : राज्यसभेच्या निवडणुकीत पूर्वी शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून गेला होता; परंतु, विधिमंडळातील सध्याचे संख्याबळ पाहता आता महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राज्यसभेवर निवडून जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष दावा करत आहे. महाविकास आघाडी म्हणून राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ. महाविकास आघाडीचे प्रतिनिधी म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, गटनेते ॲड. रामचंद्र उर्फ चंदू कदम, माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी आमदार दीप्ती चवधरी, आदी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्यासाठी राज्यसभेवर काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे, अशी माझी त्यांना विनंती आहे. प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालत लोकशाहीला तिलांजली देण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत असतो. तशीच त्यांची भूमिका आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न मागे राहतात. राज्यातील या ‘लुटारू’ सरकारने घोटाळ्यांच्या प्रश्नावर उत्तर द्यावे, श्वेतपत्रिका काढावी. महाविकास आघाडीच्या आजच्या अधिवेशनपूर्व बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार का गैरहजर राहिले, हे माहिती नाही; परंतु, प्रत्यक्ष विधिमंडळात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरेल, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये हिंसेला थारा नाही

मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस तालिबानी पद्धतीने कारभार करतात. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनवर हल्ला केला, त्या दिवशी पोलिसांवर कोणाचा दबाव होता? काँग्रेसमध्ये हिंसेला थारा नाही. मात्र आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो. आज पोलिसांनी दिलेली सुरक्षाव्यवस्था त्या दिवशी का दिली नाही, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

सोयाबीन, मका, कापूस उत्पादकांना फटका बसणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबावाखाली येत अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे सोयाबीन, मका, कापूस उत्पादकांना फटका बसणार आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी आम्ही राज्यात पदयात्रा काढणार आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray to Council, Congress to Rajya Sabha: Harshvardhan Sapkal

Web Summary : Harshvardhan Sapkal proposes Uddhav Thackeray to Legislative Council, Congress to Rajya Sabha, citing current assembly strength. He criticizes the ruling party's chaotic sessions and demands accountability on alleged scams. He also accuses Fadnavis of a 'Taliban-style' governance, condemning the attack on Congress Bhavan. He warns farmers will be hit by the US trade deal.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे