भोर तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट;९ जागा बिनविरोध, ३ ठिकाणी मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 19:16 IST2026-04-23T19:15:04+5:302026-04-23T19:16:13+5:30
तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये ९ सरपंच व ३४ सदस्य अशा एकूण ४३ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती.

भोर तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट;९ जागा बिनविरोध, ३ ठिकाणी मतदान
भोर : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. खडकी आणि रावडी येथे सरपंचपदासाठी, तर अंगसुळे ग्रामपंचायतीतील एका सदस्यपदासाठी मतदान होणार आहे.
निवासी नायब तहसीलदार अरुण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये ९ सरपंच व ३४ सदस्य अशा एकूण ४३ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. सरपंचपदासाठी १२ तर सदस्यपदासाठी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत एक अर्ज बाद झाला, तर सहा उमेदवारांनी माघार घेतली.
यामुळे सोनवडी, शिरवली तर्फे भोर, पऱ्हर बुद्रुक, करंदी खुर्द आणि आपटी या पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. तसेच सांगवी बुद्रुक, वडतुंबी, पऱ्हर बुद्रुक आणि कांबरे खेबा येथे प्रत्येकी एक अशा चार सदस्यांची निवडणूकही बिनविरोध पार पडली. आता खडकी व रावडी येथे सरपंचपदासाठी आणि अंगसुळे येथे सदस्यपदासाठी मंगळवारी (दि २८) मतदान होणार असून या निवडणुकांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.