शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाची शंभरी तीन विषयांमध्ये होणार ग्रंथबद्ध; शंभर वर्षांचा इतिहास उलगडणार

By राजू इनामदार | Updated: November 16, 2025 12:21 IST

देशातील कोणत्याही प्रादेशिक भाषेला नाही ते वार्षिक संमेलनाचे वैभव मराठी भाषेला लाभले आहे. अगदी सुरुवातीच्या संमेलनापासूनच्या प्रत्येक संमेलनातील असंख्य घटना-घडामोडींचा हा भलामोठा 'शब्दपट'च असणार

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा तब्बल १०० वर्षांचा इतिहास तीन विषयांमध्ये शब्दबद्ध करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास सुरुवात झाली आहे. साहित्य महामंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. लेखक तसेच विषयांची निश्चिती करून प्रकाशनासाठी सन २०२७ मध्ये होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही वेळही ठरवली आहे.

देशातील कोणत्याही प्रादेशिक भाषेला नाही ते वार्षिक संमेलनाचे वैभव मराठी भाषेला लाभले आहे. अगदी सुरुवातीच्या संमेलनापासूनच्या प्रत्येक संमेलनातील असंख्य घटना-घडामोडींचा हा भलामोठा 'शब्दपट'च असणार आहे. पुढील वर्षी (सन २०२६) ९९वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यात या ग्रंथांची घोषणा केली जाईल. त्यानंतर पुढील वर्षभर त्यावर काम सुरू राहील. त्यानंतर सन २०२७ मध्ये होणाऱ्या १००व्या संमेलनात या तीनही ग्रंथांचे प्रकाशन होईल.

महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली. संमेलन झाल्यानंतर आलेल्या वृत्तांतामधून किंवा काही लेखांमधून व अहमदनगरच्या साहित्य संमेलनानंतर संयोजकांनी प्रकाशित केलेल्या 'संवाद' सारख्या पुस्तकातून क्वचितवेळी यावर लिहिले गेले आहे. 'संमेलनाध्यक्षांची भाषणे' यासारखी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, मात्र एकूण इतिहास असे कधीही लिहिला गेला नाही. त्यामुळेच हा प्रकल्प साकार करण्याची कल्पना पुढे आली, असे जोशी यांनी सांगितले.'राजकीय व सामाजिक भूमिका' असा एक विषय असेल 'लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या' या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून दिलेल्या संदेशापासून ते अलीकडच्या लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेल्या राजा तू चुकतो आहेस' या निर्देशापर्यंत, व्हाया आणीबाणीतील दुर्गा भागवत अशा प्रत्येक संमेलनाध्यक्षांचे धोरण, भूमिका,त्याचा परिणाम याचा धांडोळा या विषयामधून घेतला जाईल, महामंडळाने प्रा. प्रकाश पवार यांना याबाबत पत्र दिले असून, त्यांनी महामंडळाची विनंती मान्यही केली आहे. 'वाङ्‌मयीन भूमिका' हा दुसरा विषय आहे. यामध्ये साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या 'संजीवन समाधीची अनुभूती देते ते साहित्य' या व्याख्येपासून ते 'कलेसाठी कला की जीवनासाठी कला' या वादापर्यंत प्रत्येक वाङ्मयीन वादविवादाविषयी खोलवर माहिती घेऊन लिहिले जाईल. प्रा. रणधीर शिंदे यांनी यावर काम सुरू केले आहे.

मराठी भाषिकांच्या संस्कृतीत फरक पडला ?

'सांस्कृतिक भूमिका' हा तिसरा विषय असून, यातही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठी संस्कृतीविषयी काय काम झाले? त्याचा मराठी साहित्यावर काय परिणाम झाला?, मुळात संमेलनामुळे मराठी भाषिकांच्या संस्कृतीत काय फरक पडला? वाचकांच्या भूमिकेत कायकाय बदल झाले? याचा सविस्तर आढावा घेतला जाईल. अविनाश सप्रे यांना महामंडळाने याविषयी जबाबदारी दिली.

 यासाठीचे संदर्भसाहित्य, माहिती वगैरे सर्च आवश्यक गोष्टी महामंडळाकडून संबंधित लेखकांना दिल्या जातील. संमेलनाला उपस्थित व्यक्तींच्या मुलाखती, वगैरे गोष्टींचा तीनही खंडात समावेश असेल. सध्या प्राथमिक स्वरूपात हे काम सुरू आहे, त्याला अंतिम स्वरूप लवकरच मिळेल. तीनही ग्रंथ परिपूर्ण, सविस्तर, रंजक, माहितीपूर्ण व संदर्भग्रंथांचे मूल्य असलेले असे व्हावेत, अशी अपेक्षा आहे.  -  प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Literary Meet's Centenary: History to be Documented in Three Volumes

Web Summary : The 100-year history of the Marathi Literary Meet will be documented in three volumes, covering political, literary, and cultural aspects. The project, initiated by the Sahitya Mahamandal, aims for publication by 2027, coinciding with the 100th meet.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे