पुणे : अष्टविनायक आराखड्याअंतर्गत राज्य सरकारने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुरातत्त्व विभागामार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर येथे सुरू असलेल्या जतन व दुरुस्ती कामांमुळे मंदिर १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
मागील तीन महिन्यांपासून मंदिरातील मुख्य रचना तसेच परिसरातील जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे प्रगतिपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा ठराव घेतला असून, सहायक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनीही त्यास मान्यता देत संबंधित आदेश जारी केले आहेत.
या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी नित्य पूजा-अर्चा, अभिषेक व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहणार आहेत. मात्र, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. तसेच बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय इतर कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
मंदिरातील विकासकामे ही दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असल्याने ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या कामांचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक तसेच रांजणगाव देवस्थान विश्वस्तांनी केले आहे.
विकासकामांचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस व स्थानिक प्रशासन यांच्या परवानगीने आणि पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत मंदिराचे अधिक सुंदर आणि सुरक्षित सुविधायुक्त काम करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने दुरुस्ती कामासाठी मंदिर बंद ठेवणे गरजेचे आहे. - डॉ. वि. पुं. वाहणे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे
Web Summary : The Ranjangaon Mahaganpati Temple will be closed to devotees from April 15th to July 31st for renovation. Essential rituals will continue. The closure ensures timely completion of safety and facility upgrades, urging public cooperation.
Web Summary : रांजणगाँव महागणपति मंदिर 15 अप्रैल से 31 जुलाई तक नवीनीकरण के लिए बंद रहेगा। आवश्यक अनुष्ठान जारी रहेंगे। मंदिर को सुरक्षित और सुविधायुक्त बनाने के लिए सहयोग अपेक्षित है।