दस्त नोंदणीची कार्यालये सुरूच राहणार; जनगणनेसाठीच्या कामाचा आदेश केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:05 IST2026-05-15T14:05:03+5:302026-05-15T14:05:24+5:30

शहरात मोठ्या प्रमाणावर जमीन, सदनिका, दुकाने आदी मालमत्तांचे व्यवहार होतात. या सर्व व्यवहारांची दस्तनोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात होते.

pune news document registration offices will continue; order for census work cancelled | दस्त नोंदणीची कार्यालये सुरूच राहणार; जनगणनेसाठीच्या कामाचा आदेश केला रद्द

दस्त नोंदणीची कार्यालये सुरूच राहणार; जनगणनेसाठीच्या कामाचा आदेश केला रद्द

पुणे : शहर आणि जिल्हाभरात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील शहरातील तब्बल ९० टक्के कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले होते. त्यामुळे १५ मे ते १५ जून या महिनाभराच्या कालावधीत शहरातील २७ पैकी १५ दस्तनोंदणीची कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय सहजिल्हा निबंधक कार्यालयाने घेतला होता. मात्र, शहर जनगणना कार्यालयाने काही कर्मचाऱ्यांचे आदेश रद्द केले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील कोणतेही दुय्यम निबंधक कार्यालये बंद राहणार नाहीत, अशी माहिती सह जिल्हा निबंधक कार्यालयाने दिली आहे.

राज्याला दस्त नोंदणीतून महसूल देणाऱ्या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा अग्रेसर आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर जमीन, सदनिका, दुकाने आदी मालमत्तांचे व्यवहार होतात. या सर्व व्यवहारांची दस्तनोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात होते. शहरात २७ दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणीचे काम होते. जर यातील १५ कार्यालये महिनाभर बंद राहिली असती तर दस्तनोंदणीसाठी उर्वरित कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली असती. तसेच दस्तनोंदणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले असते. याचा परिणाम राज्याच्या महसुलावर झाला असता. या सर्व पार्श्वभूमीवर नोंदणी व मुद्रांक विभागाने शहर जनगणना अधिकारी यांच्याकडे या कर्मचाऱ्यांची जनगणनेच्या कामातून वगळण्याची विनंती करण्यात आली. ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे आता शहरातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार आहेत.

Web Title : दस्तावेज़ पंजीकरण कार्यालय खुले रहेंगे; जनगणना कार्य आदेश रद्द।

Web Summary : पुणे के दस्तावेज़ पंजीकरण कार्यालय खुले रहेंगे। जनगणना कार्य के लिए कर्मचारियों को तैनात करने का पूर्व आदेश, जिससे कुछ कार्यालय अस्थायी रूप से बंद हो जाते, रद्द कर दिया गया है, जिससे संपत्ति लेनदेन में व्यवधान नहीं होगा।

Web Title : Deed registration offices remain open; census work order canceled.

Web Summary : Pune's deed registration offices will remain open. An earlier order deploying staff for census work, which would have temporarily closed some offices, has been revoked, preventing disruption to property transactions.