महापालिकेत नवजातांसाठी आता बिलीरुबिन टेस्ट मीटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:55 IST2026-04-23T18:55:00+5:302026-04-23T18:55:11+5:30

- नवजात बालकांच्या आरोग्य सेवेला सक्षम करण्यासाठी पालिकेचा शहरातील प्रसूती रुग्णालयांमध्ये नवे टेस्ट मीटर बसविण्याचा निर्णय

pune news bilirubin test meter now available for newborns in Municipal Corporation | महापालिकेत नवजातांसाठी आता बिलीरुबिन टेस्ट मीटर

महापालिकेत नवजातांसाठी आता बिलीरुबिन टेस्ट मीटर

पुणे : नवजात बालकांच्या आरोग्य सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने शहरातील प्रसूती रुग्णालयांमध्ये बिलीरुबिन टेस्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा महापालिकेच्या प्रसूती रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात १९ प्रसुती रुग्णालये चालवली जातात.  या रुग्णालयांमध्ये नवजात बाळांमध्ये कावीळ (जॉन्डिस) चे प्रमाण जलद आणि अचूकपणे मोजण्यासाठी बिलीरुबिन टेस्ट मीटर बसवण्यात येणार आहे. कावीळ ही सामान्य समस्या असली तरी वेळेवर निदान न झाल्यास ती गंभीर रूप धारण करू शकते. तंत्रज्ञानावर आधारित असून बाळाच्या ही मशीन नॉन-इनवेसिव्ह त्वचेवर हलक्या स्पर्शाने बिलीरुबिनची पातळी मोजता येते. त्यामुळे रक्त घेण्याची गरज कमी होऊन बाळाला होणारा त्रासही टाळता येणार आहे. 

आर्थिकदृष्ट्याही नागरिकांना दिलासा

पालिकेच्या या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेली ही सुविधा आता पालिकेच्या रुग्णालयांमध्येही उपलब्ध होणार असल्याने आर्थिकदृष्ट्याही नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच, नवजात बालकांच्या मृत्यूदरात घट होण्यासही या तंत्रज्ञानाचा हातभार लागेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title : पुणे महानगरपालिका नवजातों के लिए बिलीरुबिन टेस्ट मीटर लगाएगी

Web Summary : पुणे के महानगरपालिका अस्पताल नवजातों के लिए बिलीरुबिन टेस्ट मीटर स्थापित करेंगे। यह गैर-आक्रामक तकनीक पीलिया का तेजी से पता लगाती है, जिससे रक्त निकालने की आवश्यकता कम होती है और सस्ती, गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवा मिलती है, जिससे शिशु मृत्यु दर कम हो सकती है।

Web Title : Pune Municipal Corporation to Introduce Bilirubin Test Meters for Newborns

Web Summary : Pune's municipal hospitals will install bilirubin test meters for newborns. This non-invasive technology quickly detects jaundice, reducing the need for blood draws and providing affordable, quality healthcare, potentially lowering infant mortality rates.