Pune Nasrapur Case: नराधमाची उडवाउडवीची उत्तरे; तपासात सहकार्य नाही, पोलिसांची न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 20:59 IST2026-05-12T20:58:54+5:302026-05-12T20:59:04+5:30

Pune Nasrapur Case मुलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून, त्या टणक वस्तुने केल्याचे निदर्शनास आले होते, त्या वस्तुबाबत आरोपीकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देत नाही

Pune Nasrapur Case Vague answers about homicide; No cooperation in investigation, police inform court | Pune Nasrapur Case: नराधमाची उडवाउडवीची उत्तरे; तपासात सहकार्य नाही, पोलिसांची न्यायालयात माहिती

Pune Nasrapur Case: नराधमाची उडवाउडवीची उत्तरे; तपासात सहकार्य नाही, पोलिसांची न्यायालयात माहिती

पुणे: नसरापूर येथे लैंगिक अत्याचारात जीव गमावलेल्या चिमुरडीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून, त्या जखमा टणक वस्तुने केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. त्या वस्तुबाबत चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देत नाही. तसेच सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपीच्या हातामध्ये शेवेचा पुडा दिसत आहे. ती शेव त्याने कोठून खरेदी केली याबाबत प्रश्न विचारला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असून, तपासात सहकार्य करत नाही, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

दरम्यान, विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीत १४ मे पर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला आहे. नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्या प्रकरणी भीमराव कांबळे (वय ६५) याला अटक करण्यात आली होती. ही घटना १ मे रोजी घडली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला मंगळवारी पुन्हा ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

या प्रकरणी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये पीडितेच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून, त्या टणक वस्तुने केल्याचे निदर्शनास आले होते. त्या वस्तुबाबत आरोपीकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देत नाही. तसेच, पीडितेला गोठ्यात घेऊन जात असताना आरोपीच्या हातामध्ये शेवेचा पुडा दिसत आहे. ती शेव त्याने कोठून खरेदी केली याबाबत त्याला प्रश्न विचारला असता तो उत्तर देण्यास टाळाटाळ करत असून, तपासात सहकार्य करत नाही. घटना स्थळाच्या आसपासच्या परिसरातून आणखी काही सीसीटीव्ही चित्रीकरण प्राप्त झाले असून, त्यात नवीन काही माहिती मिळते का? त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्याला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली आहे का? याचा तपास करायचा आहे. त्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी युक्तिवादा दरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. अरूंधती ब्रह्मे यांनी केली. सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्याचा आदेश दिला.

Web Title : पुणे नसरापुर मामला: आरोपी असहयोगी, सवालों से बच रहा, पुलिस ने अदालत को बताया

Web Summary : नसरापुर पीड़िता के शव परीक्षण से कठोर वस्तु से चोटों का पता चला। आरोपी वस्तु और सेव की खरीद के बारे में सवालों से बच रहा है, जिससे जांच बाधित हो रही है। अदालत ने 14 मई तक पुलिस हिरासत बढ़ाई।

Web Title : Pune Nasrapur Case: Accused Uncooperative, Evading Questions, Police Inform Court

Web Summary : Nasrapur victim's autopsy revealed injuries from a hard object. The accused is evading questions about the object and shev purchase, hindering the investigation. Court extends police custody until May 14th.