Pune Nasrapur Case : नसरापूर घटनेतील कुटुंबाला शासकीय मदत देण्याची कार्यवाही सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 17:11 IST2026-05-06T17:11:12+5:302026-05-06T17:11:33+5:30
Pune Nasrapur Case - याबाबत संबंधित कुटुंबाने निवेदन दिले असून त्याची दखल घेत त्यावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Pune Nasrapur Case : नसरापूर घटनेतील कुटुंबाला शासकीय मदत देण्याची कार्यवाही सुरू
पुणे : नसरापूर येथे घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत धक्कादायक असून, पीडित कुटुंबाला राज्य सरकारकडून शासकीय मदत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘याबाबत संबंधित कुटुंबाने निवेदन दिले असून त्याची दखल घेत त्यावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसे त्या कुटुंबाला लेखी कळविण्यात आले आहे.
तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्पर कारवाई करत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी घेतली जाणार आहे. त्यासाठी विशेष वकिलाची नेमणूक करण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत आरोपीस मृत्युदंड व्हावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. संबंधित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याबाबत प्रशासन कटिबद्ध आहे.’