पुणे : महापालिकेच्या भवनरचनाविभागात भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांत एका कामावरून जोरदार भांडण झाले. माजी नगरसेविकेने यावरून विद्यमान नगरसेविकेला अपशब्द वापरल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्या प्रयत्नातून बाणेर येथे ६ कोटी रुपये खर्च करून मागासवर्गीय व आदिवासी मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी अडीच कोटींच्या निविदेला मान्यता देण्यात आली आहे.
यंदा राजश्री काळे यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांच्या जागी भाजपच्या नगरसेविका म्हणून रोहिणी चिमटे माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात बाचाबाची निवडून आल्या आहेत. महापालिकेच्या भवन विभागात या प्रकल्पाच्या कामासंदर्भात माहिती घेण्यासाठी रोहिणी चिमटे तिथे गेल्या असता त्याचवेळी माजी नगरसेविका राजश्री काळे उपस्थित होत्या. त्यावेळी रोहिणी चिमटे या भवन विभागामध्ये ठेकेदारासाठी आल्या होत्या, असा आरोप राजश्री काळे यांनी केल.
वसतिगृहाचे काम माझ्या प्रभागात चालू आहे. त्यामुळे हे काम का सुरू झाले नाही, याची माहिती घेण्यासाठी भवन विभागात गेले होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी कामाची विचारणा का केली? म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असे भाजपच्या नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी सांगितले. अखेर दोन्ही आजी-माजी नगरसेविकांचा वाद हा स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांच्या दालनात पोहोचला. त्यांनी वाद न वाढवण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, माजी नगरसेविका राजश्री काळे सातत्याने वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यांनी यापूर्वीही पालिकेत भांडणे केली आहेत.
Web Summary : A dispute erupted between current and former BJP corporators in Pune over a delayed hostel construction project. Accusations of verbal abuse and interference in contractor dealings led to escalated tensions, requiring intervention from the Standing Committee Chairman to de-escalate the situation.
Web Summary : पुणे में भाजपा की वर्तमान और पूर्व पार्षदों के बीच छात्रावास निर्माण परियोजना में देरी को लेकर विवाद हो गया। मौखिक दुर्व्यवहार और ठेकेदार के मामलों में हस्तक्षेप के आरोपों से तनाव बढ़ गया, जिसके कारण स्थिति को शांत करने के लिए स्थायी समिति के अध्यक्ष को हस्तक्षेप करना पड़ा।