शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
4
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
5
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
6
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
7
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
8
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
9
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
10
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
12
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
13
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
14
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
15
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
16
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
17
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
18
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
19
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
20
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या सत्तेची सर्व सूत्रे जुन्याच कारभाऱ्यांच्या हाती? विरोधकांसह भाजपमधूनही आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 11:11 IST

Pune Municipal Corporation स्थायी समितीवर भाजपचे १२, राष्ट्रवादी काँग्रेस ३ आणि काँग्रेस १ अशा सदस्यांची नियुक्ती झाली. तर इतर समित्यांवर भाजपचे प्रत्येक समितीवर १०, राष्ट्रवादीचे २ तर कॉंग्रेस १ अशा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली

पुणे : महापालिकेमध्ये २०१७ च्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपचे ९९ नगरसेवक निवडून देऊनही महापालिकेतील पदे काही मोजक्याच नगरसेवकांकडे ठेवल्याने इतरांवर केवळ मतदानाच्या वेळी हात वर करण्याचीच वेळ आली, असा आरोप विरोधकांसह भाजपमधूनही झाला. आता स्थायी समितीसह इतर विषय समित्यांवर निवड झालेल्या सदस्यांची नावे पाहता, नवीन सभागृहातही सत्तेची सर्व सूत्रे जुन्याच कारभाऱ्यांच्या हाती जाण्याची चर्चा महापालिकेत आहे.

महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी ११९ नगरसेवक निवडून देत भाजप स्पष्ट बहुमत दिले आहे. पुण्याचे महापौर आणि उपमहापौरपद पदांची नियुक्ती झाल्यानंतर स्थायी समितीसह इतर विषय समित्यांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महापालिकेच्या कारभारामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या स्थायी समिती व शहर सुधारणा समितीवर निवड होण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपापल्या वरिष्ठांकडे फिल्डींग लावली होती. 

महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीवर एकूण १६ सदस्यांची तर शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण, विधी, क्रीडा आणि नाव समित्यांवर प्रत्येकी १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये स्थायी समितीवर भाजपचे १२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३ आणि काँग्रेस १ अशा सदस्यांची नियुक्ती झाली. तर इतर समित्यांवर भाजपचे प्रत्येक समितीवर १०, राष्ट्रवादीचे २ तर कॉंग्रेस १ अशा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या समित्यांवर एकूण ९४ नगरसेवकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्या करताना भाजपसह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीनही पक्षांनी जुन्यांसह नवख्यांना संधी दिली आहे. या सदस्यांमधून एकाची निवड समितीच्या अध्यक्षपदी केली जाणार आहे. ही निवड आठवडाभरात होणे अपेक्षित आहे.
भाजपकडून मागील सत्ताकाळात सभागृहनेते पद भूषविलेले ज्येष्ठ नगरसेवक गणेश बिडकर यांच्यावर पुन्हा सभागृह नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसे विषय समित्यांवर भाजपने निवडलेल्या सदस्यांची नावे पाहता महत्त्वाच्या समित्यांवर यापूर्वी महत्त्वाची पदे भोगलेल्या सभासदांची वर्णी लागली आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा जुन्याच कारभाऱ्यांच्या हाती सोपवण्यात येणार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू झाली आहे. असे झाल्यास गतवेळी प्रमाणे यावेळीही बहुसंख्या नगरसेवकांवर मतदानाच्या वेळी केवळ हात वर करण्याचीच वेळ येणार आहे.

स्थायी समिती 

भाजप : रूपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भूमकर, विशाल धनवडे, प्राची आल्हाट, दादा कोद्रे, श्रीनाथ भिमाले, मयुरी कोकाटे, वृषाली कामठे, संदीप बेलदरे, रत्नमाला सातव, निशा मानवतकर.
राष्ट्रवादी काँग्रेस : अमोल बालवडकर, वैशाली बनकर, सुहास टिंगरे
काँग्रेस : प्रशांत जगताप

विधी समिती

भाजप : अर्चना जगताप, हर्षदा भोसले, सिद्धी शिळीमकर, स्वरदा बापट, ॲड. मिताली सावळेकर, पूजा पांचाळ, पायल तुपे, शैलजीत बनसोडे, वर्षा साठे, हरिदास चरवड,
राष्ट्रवादी काँग्रेस : रेखा टिंगरे, स्मिता कोंढरे
काँग्रेस : साहिल केदारी

शहर सुधारणा समिती

भाजप : मारुती तुपे, श्रेयस खांदवे, किशोर धायरकर, श्रीकांत जगताप, सपना छाजेड, मृणाल कांबळे, स्वप्नाली पंडित, पुनीत जोशी, स्मिता वस्ते, सुभाष नाणेकर.
राष्ट्रवादी काँग्रेस : स्वप्नील दुधाणे, अजित घुले
काँग्रेस : रफिक शेख

महिला व बाल कल्याण समिती 

भाजप : उज्ज्वला जंगले, अल्पना वरपे, अर्चना पाटील, कोमल शेंडकर, तन्वी दिवेकर, भक्ती गायकवाड, रोहिणी चिमटे, ज्योती गोसावी, ऐश्वर्या थोरात, ज्योत्स्ना कुलकर्णी,
राष्ट्रवादी काँग्रेस : सुरेखा कवडे, प्रिया गदादे
काँग्रेस : अश्विनी लांडगे.

क्रीडा समिती 

भाजप : अपूर्व खाडे, किशोर धनकवडे, सई थोपटे, तेजश्री पवळे, नारायण गलांडे, रेश्मा बराटे, स्नेहा माळवदे, दिनेश माथवड, व्यंकोजी खोपडे, महेश आवळे.
राष्ट्रवादी काँग्रेस : गौरव घुले, प्रतीक कदम
काँग्रेस : सय्यद काशीफ फकरूल

शिक्षण समिती 

भाजप : अरुण राजवाडे, अतुल तरवडे, ऐश्वर्या पाटील, निवेदिता एकबोटे, मनिषा बुटाला, सारिका घुले, वृषाली रिठे, कोमल नवले, वीणा घोष, कुणाल टिळक.
राष्ट्रवादी काँग्रेस : हर्षवर्धन मानकर, शीतल सावंत
काँग्रेस : अरविंद शिंदे

नाव समिती 

भाजप : शैलजा भोसले, सुनील पांडे, सायली वांजळे, अश्विनी भंडारे, रुपाली पवार, रामदास दाभाडे, उज्वला यादव, विवेक यादव, पल्लवी जावळे, खंडू सतीश लोंढे.
राष्ट्रवादी काँग्रेस : गणेश कल्याणकर, श्वेता घुले
काँग्रेस : वैशाली भालेराव

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipal Corporation: Old hands likely to retain power, sparks controversy.

Web Summary : Despite a new term, Pune Municipal Corporation's key posts may remain with familiar faces, drawing criticism from opposition and within BJP. Committee appointments suggest veteran corporators will hold sway, potentially limiting newer members' influence on decision-making.
टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसPoliticsराजकारणSocialसामाजिकMONEYपैसा