तांत्रिक अडचणीमुळे म्हाडाची सदनिका वितरण प्रक्रिया १५ दिवस लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:01 IST2026-05-14T17:00:04+5:302026-05-14T17:01:06+5:30

Pune mhada : सदनिकांची वितरण प्रक्रिया १३ मे म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सुरु करण्यात येणार

Pune mhada MHADA flat distribution process delayed by 15 days due to technical difficulties | तांत्रिक अडचणीमुळे म्हाडाची सदनिका वितरण प्रक्रिया १५ दिवस लांबणीवर

तांत्रिक अडचणीमुळे म्हाडाची सदनिका वितरण प्रक्रिया १५ दिवस लांबणीवर

पुणे : तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील सदनिकांची वितरण प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही सोडत आता २८ मे रोजी होणार आहे. म्हाडाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून (म्हाडा) १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणी अभावी रिक्त राहिलेल्या २९५ सदनिकाच्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर वाटप करण्यासाठी २३ एप्रिल रोजी जाहिरात देण्यात आली होती.

सदनिकांची वितरण प्रक्रिया १३ मे म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सुरु करण्यात येणार होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे सदनिकांची वितरण प्रक्रिया २८ मे रोजी दुपारी अडीच वाजता काढण्यात येणार आहे, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title : तकनीकी दिक्कतों के कारण म्हाडा का आवास आवंटन 15 दिन के लिए स्थगित

Web Summary : तकनीकी दिक्कतों के चलते पुणे म्हाडा का 'पहले आओ, पहले पाओ' आवास आवंटन 28 मई तक टल गया है। म्हाडा के अनुसार, 295 खाली फ्लैटों के लिए 13 मई से शुरू होने वाली प्रक्रिया अब ऑनलाइन शुरू होगी।

Web Title : MHADA Housing Allocation Delayed by 15 Days Due to Technical Issues

Web Summary : Pune MHADA's first-come, first-served housing allocation is delayed to May 28th due to technical difficulties. The process, initially scheduled for May 13th for 295 vacant flats, will now begin later online, according to MHADA's announcement.