शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात खडकवासला धरण 100 टक्के भरले, शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला पूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 17:07 IST

पुण्यात सध्या सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली असून बाकीची धरणे सुद्धा भरण्याच्या स्थितीत आहेत. शहरालगत असलेले खडकवासला धरण सुद्धा शंभर टक्के भरले आहे.

पुणे, दि. 20 - पुण्यात सध्या सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली असून बाकीची धरणे सुद्धा भरण्याच्या स्थितीत आहेत. शहरालगत असलेले खडकवासला धरण सुद्धा शंभर टक्के भरले आहे. या धरणातून 23 हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एकंदरित पाहता मुठा नदीला पूर आल्याचे दिसते, कारण येथील भिडे पूल आणि त्याशेजारील नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. तसेच, काही नदीपात्रात असलेली वाहने पाण्यात वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवार (19 सप्टेंबर) पासून एकदा पावसाला दमदार सुरुवात झाली. त्यानंतर आजही दिवसभर कधी जोर तर कधी संतधार असा पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस पडल्याने 25 पैकी जवळपास 16 धरणे शंभर टक्के  भरली आहेत. यामध्ये खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या धरणांचा समावेश आहे. खडकवासला धरणातून मुठेत 23 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. या परिसरात पावसाची संततधार सुरूच असून, ती अशीच राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वरसगाव धरणातूनही सोडलेले पाणी खडकवासल्यात येत आहे. धरणात जवळपास 25 हजार क्युसेक्स वेगाने पाणी जमा देखील होते आहे. त्यामुळे ही संततधार अशीच सुरु राहिल्यास विसर्ग वाढवावा लागणार आहे.

मुळा नदीतही मुळशी धरणातून पाणी येत असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे कोणतीही आपत्ती उद्भवल्यास महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या  202205501269/25506800/ 25506801/ 25506800/ 25506801/ 255006802/ 25506803/ 25506804 या क्रमांकावर, तसेच अग्निशमन दलाच्या मदतीसाठी 101 या क्रमांकावर, पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी 100 या क्रमांकावर, तसेच 020 25501133/ 25501130 या क्रमांकावर सुरक्षा रक्षकांच्या मदतीसाठी संपर्क करता येणार आहे. ही सेवा 24 तास सुरू आहे. 

टॅग्स :Puneपुणे