Pune: मद्यप्राशन करून बसमध्ये धिंगाणा; प्रवाशांना शिवीगाळ, उतरण्यास सांगितल्यावर महिला कंडक्टरवर चाकूने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:59 IST2026-04-16T17:58:31+5:302026-04-16T17:59:35+5:30

मद्यप्राशन केले असल्यामुळे प्रवाशांना शिवीगाळ करत असून महिला कंडक्टरला तिकिटे काढताना अडथळा निर्माण करत होता

pune drunk bus driver creates ruckus abuses passengers attacks female conductor with knife after asking her to get off | Pune: मद्यप्राशन करून बसमध्ये धिंगाणा; प्रवाशांना शिवीगाळ, उतरण्यास सांगितल्यावर महिला कंडक्टरवर चाकूने हल्ला

Pune: मद्यप्राशन करून बसमध्ये धिंगाणा; प्रवाशांना शिवीगाळ, उतरण्यास सांगितल्यावर महिला कंडक्टरवर चाकूने हल्ला

पुणे : मद्यप्राशन केलेल्या एका माथेफिरू प्रवाशाने बसमध्ये महिला कंडक्टरवर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात महिलेच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेखा बळीराम भालेराव (वय. ३८, रा. मुळशी, मुळ. मुखेड, नांदेड) असे जखमी झालेल्या कंडक्टर महिलेचे नाव आहे. याप्रकरणी, भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. १५) रात्री आठच्या सुमारास अलंकार चौक परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेराव या पीएमपीमध्ये कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत. बुधवारी सायंकाळी सात वाजता त्या कंडक्टर म्हणून मनपा ते एसआरए विमाननगर या बसमध्ये कर्तव्यावर होत्या. जुना बाजार चौकातून एक प्रवासी बसमध्ये चढला. त्याने जुना बाजार ते येरवडा असे तिकीट काढले. काही वेळाने तो प्रवाशी बसमधील इतर प्रवाशांना शिवीगाळ करू लागला. त्याने मद्यप्राशन केले असल्यामुळे प्रवाशांनी सुरवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तरी तो शिवीगाळ करत होता. त्याने फिर्यादींना इतर प्रवाशांची तिकिटे काढत असताना अडथळा निर्माण केला. अलंकार चौकात बस आल्यानंतर रात्री आठच्या सुमारास फिर्यादींनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने तो फिर्यादी यांच्या अंगावर धाऊन गेला. तसेच मोठ्याने शिवीगाळ करून त्यांना तिकीट काढण्यापासून परावृत्त करू लगाला. फिर्यादींनी बस थांबवून त्याला खाली उतरण्यास सांगितले. दरम्यान, त्याचा राग आरोपीला आला. त्यातूनच त्याने खिशातून चाकू काढून फिर्यादी यांच्या मांडीत मारला. जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. त्यावेळी आरोपीने तेथून पळ काढला. फिर्यादी महिलेचे साथीदारांनी त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याप आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.

Web Title : पुणे: नशे में धुत यात्री ने बस कंडक्टर को चाकू मारा।

Web Summary : पुणे में, एक नशे में धुत यात्री ने महिला बस कंडक्टर को बस से उतरने के लिए कहने पर चाकू मार दिया। कंडक्टर गंभीर रूप से घायल है और अस्पताल में भर्ती है। पुलिस अलंकार चौक के पास हुई घटना के बाद फरार हमलावर की तलाश कर रही है।

Web Title : Drunk passenger stabs female conductor in Pune bus after argument.

Web Summary : In Pune, a drunk passenger stabbed a female bus conductor after she asked him to get off for causing a disturbance. The conductor sustained serious leg injuries and is hospitalized. Police are searching for the absconding assailant following the incident near Alankar Chowk.