Pune Rain: पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस, मावळात दुप्पट, गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्के कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:40 IST2025-10-01T17:40:37+5:302025-10-01T17:40:55+5:30

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सरासरी ८६२ मिलिमीटर पावसाची नोंद केली जाते. यंदा प्रत्यक्षात ८५०.७ मीटर पाऊस झाला

Pune district receives 98 percent of average rainfall, double in Maval, 25 percent less than last year | Pune Rain: पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस, मावळात दुप्पट, गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्के कमी

Pune Rain: पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस, मावळात दुप्पट, गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्के कमी

पुणे: जून ते सप्टेंबर असा चार महिन्यांचा पाऊस काळ अधिकृतरित्या संपला आहे. या चार महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सरासरी ८६२ मिलिमीटर पावसाची नोंद होत असून, प्रत्यक्षात ८५०.७ मिलिमीटर अर्थात ९८.७ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात १०५२ मिलिमीटर अर्थात १२२.५ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्के पाऊस कमी झाला आहे. यंदा मावळ तालुक्यात सरासरीच्या दुपटीहून अधिक पाऊस झाला असून, आतापर्यंत २ हजार ४३३ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सरासरी ८६२ मिलिमीटर पावसाची नोंद केली जाते. यंदा प्रत्यक्षात ८५०.७ मीटर पाऊस पडला असून तो सरासरीच्या तुलनेत ९८.७ मिलिमीटर इतका आहे. सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे प्रत्यक्ष पावसाचे प्रमाण सरासरी इतके झाले आहे. या पावसामुळे पश्चिमेकडील काही तालुक्यांमध्ये सुमारे दोन हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

यंदाच्या पावसाळ्यात मावळ तालुक्यात सरासरीच्या दुपटीहून अधिक पाऊस झाला आहे. मावळात सरासरी १ हजार १८१ मिलिमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात २ हजार ४३३.७ मिलिमीटर पाऊस पडला असून, सरासरीच्या हे प्रमाण २०६.२ टक्के इतके आहे. राजगड तालुक्यात आतापर्यंत २ हजार १३.९ मिलिमीटर पाऊस पडला असून, सरासरीच्या हा पाऊस ८६.५ टक्के इतका आहे. तर पुरंदर तालुक्यात सरासरी ४६५.८ मिलिमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात या तालुक्यात ३९८.२ मिलिमीटर अर्थात ८५.५ टक्के पाऊस पडला आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सुमारे २०१८ वरील पिकांचे नुकसान झाले आहे, याचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, आठवडाभरात त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येईल. - संजय काचोळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे.

तालुकानिहाय पाऊस

तालुका सरासरी प्रत्यक्ष (मिमी) टक्के

हवेली ७०८.९--६५४--९२.३
मुळशी १५६३--१५९०.७--१०१.८
भोर ९८८.१--१०९९.१--१११.२
मावळ ११८१--२४३३.७--२०६.२
राजगड २३९८--२०७३.९--८६.५
जुन्नर ४९३.८--४४३.८--८९.९
खेड ५५३.१--६५०.१--११७.५
आंबेगाव ६९०.५--७७९--११२.८
शिरूर ३८६--४०३.४--१०४.५
बारामती ३८९.१--३२८.२--८४.४
इंदापूर ४२६.७--४२१.१--९८.७
दौंड ३५८.४--४०८.६--११४
पुरंदर ४६५.८--३९८.२--८५.५

एकूण ८६२--८५०.७--९८.७

 

Web Title : पुणे जिले में औसत से 98% बारिश, मावल में दोगुनी, 25% कम।

Web Summary : पुणे जिले में औसत बारिश का 98% हुई, मावल में दोगुनी बारिश दर्ज की गई। हालांकि, पिछले साल की तुलना में 25% कम बारिश हुई। भारी बारिश के कारण कुछ फसलें क्षतिग्रस्त हो गईं। मावल में सबसे अधिक और पुरंदर में सबसे कम बारिश हुई।

Web Title : Pune district receives 98% average rainfall, Maval double, 25% less.

Web Summary : Pune district received 98% of average rainfall, with Maval experiencing double. However, rainfall was 25% less than last year. Some crops were damaged due to heavy rains. Maval recorded the highest rainfall, while Purandar received the least.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.