शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

पुणे जिल्ह्यात आता 73 गट आणि 146 गण निश्चित; माहित करून घ्या नवीन प्रारूप रचना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 10:00 PM

शुक्रवारपर्यंत प्रारुप रचना निश्चित करून अहवाल सादर करण्याचे प्रांत अधिकाऱ्यांंना आदेश

 पुणे: राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सर्व प्रांत अधिकारी आणि संबंधित अधिका-यांची बैठक घेऊन जिल्ह्यात 73 गट व 146 गण निश्चित केले आहेत. यामध्ये गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने हवेली तालुक्यातील 7 गट कमी झाले असून, नवीन गट रचनेत जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटांची वाढ झाली आहे. तालुकानिहाय गट-गणांची संख्या निश्चित करून त्या प्रमाणे प्रारुप रचना निश्चित करून शुक्रवार पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले आहेत.

पुणे जिल्ह्यातील हवेली आणि मुळशी तालुक्यातील 23 गावे म्हणजे तब्बल अडीच लाख पेक्षा अधिक ग्रामीण लोकसंख्या महापालिका हद्दीत समाविष्ट झाली आहे. यामुळे पुणे जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्याने गटाची 2 व गणांची संख्या 4 ने कमी झाली आहे. तर हवेली तालुक्यातील गट संख्या तब्बल 7 ने कमी झाली आहे. यामुळेच नव्याने कोणत्या तालुक्यात गट-गण वाढवता येतील याबाबत संबंधीत सर्व अधिका-यांची बैठक घेऊन नवीन नियमानुसार तालुकानिहाय 73 गट व 146 गणांची संख्या निश्चित केली आहे. यामध्ये लोकसंख्येची सरासरी काढून हे गट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात गट संख्येत वाढ झाली आहे. या तालुक्यात गट-गणांच्या रचनेत मोठे फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यातील गट-गणांची असे झाले फेरबदल तालुका     नवीन गट       नवीन गण जुन्नर         8                 16 आंबेगाव    5                  10शिरूर       7                   14खेड          8                   16मावळ       5                   10मुळशी       3                   06हवेली        6                   12दौंड          7                    14पुरंदर       4                    08वेल्हा        2                    04भोर         4                     08बारामती     6                  12इंदापूर       8                    16एकूण        73                     146

गट-गणाच्या फेररचनेत आमदारांची लुडबूड राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गणांची प्रारुप रचना निश्चित करण्याचे काम सुरू आहे. परंतु जिल्हयातील काही आमदारांनी गट-गण रचनेत लुडबूड करण्याचे काम सुरू केले असून,  एका आमदाराने थेट सरंपचांकडून लेखी पत्र घेऊन तुमचे गाव कोणत्या गटात पाहिजे अशी विचारणारच केली आहे. यामुळे प्रांत अधिकारी आमदारांच्या दबावाला बळी पडून फेररचना करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड