Pune crime : मैत्रिणीच्या लग्नाला जाते म्हणाली... पण पूजा अचानक गायब झाली; नेमकं काय घडलं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 18:15 IST2026-05-15T18:15:22+5:302026-05-15T18:15:38+5:30
Pune crime - याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune crime : मैत्रिणीच्या लग्नाला जाते म्हणाली... पण पूजा अचानक गायब झाली; नेमकं काय घडलं ?
वडगाव आनंद : नळावणे (ता. जुन्नर) येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी लग्नाला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली, मात्र ती परतली नसल्याने अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बाळशीराम गंगाराम कोरके (वय. ४६, रा. नळावणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी पूजा (वय. १७ ) ही बुधवार, दि. १३ मे रोजी सकाळी ८:३० वाजता ओझर येथे मैत्रिणीच्या लग्नासाठी जाते असे सांगून घरातून निघाली होती. ती रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर, तिला कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची खात्री झाल्याने वडिलांनी पोलिसांत धाव घेतली.
या घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सतीश तव्हारे करीत आहेत. अशा वर्णनाची मुलगी कोणास आढळल्यास आळेफाटा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.