‘गे डेटिंग’ ॲपवर मैत्री अन् मग लूट...! पुण्यातील टोळीचा धक्कादायक पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 20:16 IST2026-05-09T20:14:22+5:302026-05-09T20:16:35+5:30

Crime News - कर्वेनगर परिसरातील २५ वर्षीय युवकाची आरोपींशी ‘गे डेटिंग’ ॲपवरून ओळख झाली होती.

pune crime news friendship on a gay dating app and then loot Shocking expose of a gang in Pune | ‘गे डेटिंग’ ॲपवर मैत्री अन् मग लूट...! पुण्यातील टोळीचा धक्कादायक पर्दाफाश

‘गे डेटिंग’ ॲपवर मैत्री अन् मग लूट...! पुण्यातील टोळीचा धक्कादायक पर्दाफाश

पुणे : गे डेटिंग ॲपद्वारे तरुणाशी मैत्री करायची आणि भेटायला बोलवून मारहाण करत लुटायचे, असे गुन्हे करणाऱ्या टोळीचा वारजे माळवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी अवघ्या काही तासांत एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन ओम गणेश वाघमारे (वय २०, रा. वारजे-माळवाडी), गणेश उत्तम माने (वय २७, रा. आकाशनगर, वारजे), जगदीश रामू पवार (वय २३, रा. शिवणे) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

कर्वेनगर परिसरातील २५ वर्षीय युवकाची आरोपींशी ‘गे डेटिंग’ ॲपवरून ओळख झाली होती. २८ एप्रिलच्या रात्री एका अल्पवयीन आरोपीने युवकाला कर्वेनगर येथील डी-मार्टजवळ भेटण्यास बोलवले. तेथून दुचाकीवरून फिरायला जाण्याच्या बहाण्याने त्याला निर्जनस्थळी नेले. काही वेळातच त्याचे तीन साथीदार घटनास्थळी आले. संबंधित युवक चुकीच्या हेतूने येथे आल्याचा खोटा आरोप करत चौघांनीही त्याचावर दगडाने हल्ला करत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीनंतर आरोपींनी युवकाचा मोबाईल हिसकावून ८ हजार ६०० रुपये स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करून घेतले. गळ्यातील चांदीची चेन काढून घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तांत्रिक तपास व खबऱ्याद्वारे अतुलनगर चौक परिसरातून मुख्य आरोपी ओम वाघमारे याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर अन्य आरोपींची माहिती समोर आली. त्यानंतर सर्वांना अटक झाली. तपास पोलिस उपनिरीक्षक शंकर पाटील करत आहेत.

Web Title : पुणे: गे डेटिंग ऐप से लूट, गिरोह का पर्दाफाश।

Web Summary : पुणे पुलिस ने एक गे डेटिंग ऐप का उपयोग करके लूटपाट करने वाले गिरोह का पर्दाफाश किया। 25 वर्षीय युवक को लालच देकर लूटा गया। पीड़ित को पीटा गया और उसके कीमती सामान और पैसे लूट लिए गए। एक नाबालिग सहित चार संदिग्धों को गिरफ्तार किया गया है।

Web Title : Pune: Gay dating app used to lure, rob; gang busted.

Web Summary : Pune police busted a gang using a gay dating app to lure and rob a 25-year-old man. The victim was beaten and robbed of his valuables and money. Four suspects, including a minor, have been arrested.