शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या लेकाने सिग्नलवर नव्हे माझ्या तोंडावर लघुशंका केली’; मुलाच्या कृत्याची बापाला लाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:54 IST

मनोज रमेश अहुजा यांनी माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे

- किरण शिंदे पुणे - शहरातील शिस्तप्रिय आणि सुसंस्कृत प्रतिमेला गालबोट लावणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मद्यधुंद तरुणाने लक्झरी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीला अडथळा केला आणि सिग्नलवरच लघुशंका केली. यावेळी लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट त्यांच्या दिशेने अश्लील चाळे करत अनैतिक वर्तन केलं. हा तरुण गौरव मनोज अहुजा असून, त्याच्या वडिलांच्या नावावर गाडी नोंदणी आहे. या प्रकारानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चौकशीसाठी वडील मनोज रमेश अहुजा यांना ताब्यात घेतलं.

या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली आहे. एका उच्चभ्रू घरातील तरुणाने रस्त्यावर असा माज दाखवणं आणि सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन करणं अतिशय निंदनीय आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या वर्तनाचा निषेध करत लाज व्यक्त केली आहे.सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद बेशिस्तपणा सहन केला जाणार नाही!“माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नाही, तर माझ्या तोंडावर केली आहे… त्याच्या वर्तनाची मला लाज वाटते…” हे उद्गार आहेत मनोज अहुजा यांचे, जे स्वतः या प्रकरणात जबाबदारी स्वीकारत आहेत. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीत गुन्हा नोंदवला असून, तरुणाचा शोध सुरू आहे. त्याचा मोबाईल सकाळपासून बंद असून, त्याच्या घरच्यांनीही शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.कायदा सर्वांसाठी समान.! अशा माजोरड्यांवर कठोर कारवाई होणार का?या प्रकारानंतर सामाजिक माध्यमांवर नागरिकांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. एका शहराच्या शिस्तीचा असा भंग करणं आणि सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्य वर्तन करणं हे कायद्याने गंभीर गुन्हे आहेत. पोलिसांनी या मद्यधुंद माजोरड्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.तत्पूर्वी, पोलीस अधिकारी यांनी सांगितले, 'पोलीस स्टेशन येरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने आपल्या चारचाकी वाहनातून उतरून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरच लघुशंका करत अश्लील चाळे केल्याचे दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्यामुळे त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी शोध पथके रवाना केलेली आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.'

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकYerwadaयेरवडा