Pune Crime: ‘मी ISRO सायंटिस्ट’ म्हणत विश्वास जिंकला अन्..' मेट्रोमोनियल साइटवरून महिलेची २६ लाखांची फसवणूक

By किरण शिंदे | Updated: April 22, 2026 20:07 IST2026-04-22T20:07:05+5:302026-04-22T20:07:27+5:30

पुणे - मेट्रोमोनियल वेबसाईटवर स्वतःची इस्रोमध्ये सायंटिस्ट असल्याची बनावट ओळख सांगून महिलांना लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या तोतया विरोधात गुन्हा दाखल ...

Pune Crime I am an ISRO scientist' won trust and..' Woman cheated of 26 lakhs from matrimonial site | Pune Crime: ‘मी ISRO सायंटिस्ट’ म्हणत विश्वास जिंकला अन्..' मेट्रोमोनियल साइटवरून महिलेची २६ लाखांची फसवणूक

Pune Crime: ‘मी ISRO सायंटिस्ट’ म्हणत विश्वास जिंकला अन्..' मेट्रोमोनियल साइटवरून महिलेची २६ लाखांची फसवणूक

पुणे - मेट्रोमोनियल वेबसाईटवर स्वतःची इस्रोमध्ये सायंटिस्ट असल्याची बनावट ओळख सांगून महिलांना लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या तोतया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्श प्रशांत म्हात्रे (वय 34) उर्फ स्वप्नील वारूळे, हेमंत गायकर, जयेश पाटील, रा. अलिबाग, जि. रायगड तसेच तुर्भे, रसायनी, पनवेल असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीने फिर्यादी महिलेसोबत मेट्रोमोनियल साईटवर ओळख वाढवून स्वतःला उच्चपदस्थ आणि प्रतिष्ठित असल्याचे भासवले. लग्नासाठी मागणी घालताना त्याने महिलेला भावनिक जाळ्यात ओढले. एवढ्यावरच न थांबता, फिर्यादींच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे आश्वासन देत त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगत कर्ज घेण्यास भाग पाडले आणि ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून मोठी रक्कम उकळली.

दरम्यान काही कालावधीनंतर फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी आरोपीचा तत्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपासादरम्यान संबंधित आरोपी रबाळे पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या गुन्ह्यात आधीच अटकेत असल्याचे समोर आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिल रोजी त्याला येरवडा गुन्ह्यातही अटक करण्यात आली.

Web Title : पुणे: इसरो वैज्ञानिक बनकर ठग ने महिला से ₹26 लाख लूटे

Web Summary : पुणे में एक व्यक्ति ने मैट्रिमोनियल साइट पर इसरो वैज्ञानिक बनकर एक महिला को शादी का झांसा दिया और ₹26 लाख ठग लिए। उसने महिला की बेटी की शिक्षा का खर्च उठाने का वादा करके उसका विश्वास जीता, फिर ऑनलाइन लेनदेन के माध्यम से पैसे निकाले। आरोपी पहले से ही दूसरे अपराध के लिए हिरासत में है।

Web Title : Pune: ISRO Scientist Impersonator Scams Woman of ₹26 Lakhs Online

Web Summary : A man posing as an ISRO scientist on a matrimonial site defrauded a woman of ₹26 lakhs. He gained her trust by promising marriage and financial support for her daughter's education, then extracted money through various online transactions. The accused was already in custody for another crime.