शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: आळंदीत दुहेरी हत्याकांड, गाढ झोपेत ६ वर्षीय चिमुकलीचा गळा आवळला, वृद्धेच्या डोक्यावर वार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:36 IST

Pune Crime या दुहेरी हत्याकांडामागील नेमका उद्देश काय? चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला की काही जुन्या वादातून, याचा तपास पोलीस करत आहेत

पुणे: वारकरी संप्रदायाची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीत एक धक्कादायक घटना घडली आहे. केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे एका ६ वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून, तर तिला सांभाळणाऱ्या ७९ वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी या नेहमीप्रमाणे केळगाव येथील इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगच्या कामासाठी रात्रपाळीला गेल्या होत्या. घरी त्यांची नात धनश्री सोनू दत्तात्रय केदारी (वय ६ वर्षे) आणि तिला सांभाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७९ वर्षे) या दोघीच होत्या. मध्यरात्री अज्ञात इसमाने घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळला, तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून दोघांचीही हत्या केली. गुरुवारी सकाळी संगीता गवारी या कामावरून घरी परतल्यानंतर हा भीषण प्रकार उघडकीस आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच आळंदीपोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुहेरी हत्याकांडामागील नेमका उद्देश काय? चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला की काही जुन्या वादातून, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आळंदी आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Double Murder in Alandi: Girl Strangled, Elderly Woman Killed

Web Summary : A shocking double murder in Alandi saw a 6-year-old girl strangled and a 79-year-old woman bludgeoned to death. The incident occurred at Thakkarwadi, Kelgaon. Police are investigating the motive, including robbery or old disputes, sparking outrage in the community.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याAlandiआळंदीThiefचोरSenior Citizenज्येष्ठ नागरिकPoliceपोलिसDeathमृत्यूHomeसुंदर गृहनियोजन