शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

Video : स्वारगेट आगारात सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 17:37 IST

Pune Crime : स्वारगेट आगारातील प्रवेशद्वार येथे वारंवार रिक्षाचालक आणि आगार प्रशासनामध्ये वाद होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

पुणे : पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या स्वारगेट एसटी बसस्थानक परिसरात सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालक यांच्यात पार्किंगवरून आणि बस स्थानकात रिक्षाचा अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून वारंवार तक्रारी असतात.

शनिवारी दुपारी साडेचार वाजता सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालक यांच्यात आगारातून रिक्षा बाहेर काढा यावरून वाद होऊन हाणामारी झाली. सुरक्षारक्षकांनी फोटो काढून ॲपवरून पाठवला म्हणून रिक्षाचालकाने सुरक्षारक्षकास मारहाण केली. यामुळे सुरक्षारक्षक यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रिक्षाचालकांचा शोध पोलिस घेत आहेत.  

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या स्वारगेट आगारातील प्रवेशद्वार येथे वारंवार रिक्षाचालक आणि आगार प्रशासनामध्ये वाद होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामध्ये अनधिकृत रिक्षा पार्किंग आणि प्रवाशांना होणारा त्रास यामुळे येथील वातावरण नेहमीच संवेदनशील असते. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वारगेट आगाराच्या प्रवेशद्वारावरच असा घडला प्रकार :

स्वारगेट आगाराच्या प्रवेशद्वारावर रिक्षा लावण्याच्या कारणावरून सुरक्षारक्षक आणि एका रिक्षाचालकामध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर बघता बघता हाणामारीत झाले. यावेळी रिक्षाचालक आणि आगारातील सुरक्षारक्षक एकमेकांना भिडल्याने स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या राड्यामुळे प्रवाशांचीही धावपळ झाली. रिक्षाचालकांचा फोटो काढून ॲपवर का टाकला. यामुळे दंड झाल्याने रिक्षाचालकाने चिडून तोंड ओळखून फोटो काढतोय म्हणून सुरक्षारक्षकास मारहाण केली.

--प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

स्वारगेट बसस्थानक हे पुण्याचे मुख्य वाहतूक केंद्र आहे. येथे वारंवार रिक्षाचालक आणि आगार प्रशासनामध्ये वाद होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनधिकृत रिक्षा पार्किंग आणि प्रवाशांना होणारा त्रास यामुळे येथील वातावरण नेहमीच संवेदनशील असते. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

स्वारगेट आगाराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक व रिक्षा चालकाच्यांत वारंवार वाद होत असतात. शनिवारी दुपारी साडेचार वाजता आगारात रिक्षा लावल्याने रिक्षा चालक व सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाल्याने रिक्षाचालकाने सुरक्षारक्षकास मारहाण केल्याने सुरक्षारक्षकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. स्वारगेट आगारात कडक सुरक्षा व्यवस्था करावी याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे.  - प्रमोद गायतोंडे, आगारप्रमुख स्वारगेट बसस्थानक  

English
हिंदी सारांश
Web Title : Clash Erupts at Swargate Bus Depot: Guards vs. Auto Drivers

Web Summary : A dispute over parking at Pune's Swargate bus depot escalated into a brawl between security guards and auto-rickshaw drivers. A guard was allegedly assaulted for taking photos, leading to a police complaint and renewed concerns about passenger safety due to ongoing conflicts.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र