Video : स्वारगेट आगारात सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 17:37 IST2026-05-03T17:36:45+5:302026-05-03T17:37:01+5:30
Pune Crime : स्वारगेट आगारातील प्रवेशद्वार येथे वारंवार रिक्षाचालक आणि आगार प्रशासनामध्ये वाद होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

Video : स्वारगेट आगारात सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी
पुणे : पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या स्वारगेट एसटी बसस्थानक परिसरात सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालक यांच्यात पार्किंगवरून आणि बस स्थानकात रिक्षाचा अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून वारंवार तक्रारी असतात.
शनिवारी दुपारी साडेचार वाजता सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालक यांच्यात आगारातून रिक्षा बाहेर काढा यावरून वाद होऊन हाणामारी झाली. सुरक्षारक्षकांनी फोटो काढून ॲपवरून पाठवला म्हणून रिक्षाचालकाने सुरक्षारक्षकास मारहाण केली. यामुळे सुरक्षारक्षक यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रिक्षाचालकांचा शोध पोलिस घेत आहेत.
स्वारगेट आगारात सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी; स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल#LokmatNews#MarathiNews#PuneNewspic.twitter.com/sdnBSTE8m4
— Lokmat (@lokmat) May 3, 2026
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या स्वारगेट आगारातील प्रवेशद्वार येथे वारंवार रिक्षाचालक आणि आगार प्रशासनामध्ये वाद होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामध्ये अनधिकृत रिक्षा पार्किंग आणि प्रवाशांना होणारा त्रास यामुळे येथील वातावरण नेहमीच संवेदनशील असते. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वारगेट आगाराच्या प्रवेशद्वारावरच असा घडला प्रकार :
स्वारगेट आगाराच्या प्रवेशद्वारावर रिक्षा लावण्याच्या कारणावरून सुरक्षारक्षक आणि एका रिक्षाचालकामध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर बघता बघता हाणामारीत झाले. यावेळी रिक्षाचालक आणि आगारातील सुरक्षारक्षक एकमेकांना भिडल्याने स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या राड्यामुळे प्रवाशांचीही धावपळ झाली. रिक्षाचालकांचा फोटो काढून ॲपवर का टाकला. यामुळे दंड झाल्याने रिक्षाचालकाने चिडून तोंड ओळखून फोटो काढतोय म्हणून सुरक्षारक्षकास मारहाण केली.
--प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
स्वारगेट बसस्थानक हे पुण्याचे मुख्य वाहतूक केंद्र आहे. येथे वारंवार रिक्षाचालक आणि आगार प्रशासनामध्ये वाद होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनधिकृत रिक्षा पार्किंग आणि प्रवाशांना होणारा त्रास यामुळे येथील वातावरण नेहमीच संवेदनशील असते. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्वारगेट आगाराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक व रिक्षा चालकाच्यांत वारंवार वाद होत असतात. शनिवारी दुपारी साडेचार वाजता आगारात रिक्षा लावल्याने रिक्षा चालक व सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाल्याने रिक्षाचालकाने सुरक्षारक्षकास मारहाण केल्याने सुरक्षारक्षकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. स्वारगेट आगारात कडक सुरक्षा व्यवस्था करावी याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे. - प्रमोद गायतोंडे, आगारप्रमुख स्वारगेट बसस्थानक