Pune: 'एटीएम'मधून मिळतंय दूषित पाणी, कर्वेनगरमधील धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 20:35 IST2026-04-28T20:34:57+5:302026-04-28T20:35:29+5:30

धक्कादायक बाब म्हणजे, पाणी दूषित असल्याचा अहवाल येऊनही या ठिकाणी पाण्याची विक्री सुरूच असल्याचे पाहायला मिळाले

Pune: Contaminated water is being obtained from 'ATM', shocking incident revealed in Karvenagar | Pune: 'एटीएम'मधून मिळतंय दूषित पाणी, कर्वेनगरमधील धक्कादायक प्रकार उघड

Pune: 'एटीएम'मधून मिळतंय दूषित पाणी, कर्वेनगरमधील धक्कादायक प्रकार उघड

पुणे : कर्वेनगर भागात केवळ एक रुपयात एक लिटर पाणी देणाऱ्या 'वॉटर एटीएम'मधीलपाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे सर्व वॉटर एटीएमची तातडीने तपासणी करण्याची मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर केली. शहरात पाणीपुरवठा बंद असताना कर्वेनगर भागात एका खासगी वॉटर एटीएममधून एक रुपयात एक लिटर या दराने पाण्याची विक्री केली जात होती. स्वस्त दरात पाणी मिळत असल्याने या ठिकाणी प्रामुख्याने विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गर्दी होत होती. मात्र, या पाण्याचा दर्जा आणि त्याच्या विक्रीसाठी आवश्यक असलेल्या परवानगीबाबत संशय आल्याने संदीप खर्डेकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई यांच्याकडे तक्रार केली.

तपासणीत पाणी 'अयोग्य'

तक्रारीची दखल घेत प्रशासनाने तत्काळ या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, सदर पाणी पिण्यासाठी पूर्णपणे अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पाणी दूषित असल्याचा अहवाल येऊनही या ठिकाणी पाण्याची विक्री सुरूच असल्याचे पाहायला मिळाले. ‘आम्ही ५ रुपयांत १० लिटर पाणी नेतो, ते आम्हाला दिवसभर पुरते,’ असे येथील विद्यार्थ्याने सांगितले.

Web Title : पुणे: 'एटीएम' में मिला दूषित पानी; कर्वे नगर में चौंकाने वाला मामला सामने आया

Web Summary : कर्वे नगर के 'वाटर एटीएम' में दूषित पानी मिला। जांच में पानी पीने योग्य नहीं पाया गया। रिपोर्ट के बावजूद, बिक्री जारी रही, खासकर सस्ते पानी की तलाश में छात्रों को लक्षित किया गया। शिकायतों के बाद जांच जारी है।

Web Title : Pune: Contaminated Water Found in 'ATM'; Shocking Case Uncovered in Karve Nagar

Web Summary : Contaminated water was found in a Karve Nagar 'Water ATM.' Testing revealed the water is unfit for consumption. Despite the report, sales continued, mainly targeting students seeking cheap water. An investigation is underway following complaints.