पोलीस असल्याची बतावणी; नातीसाठी महापालिकेत नोकरीचे आमिष, आजींची तब्बल ५ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:21 IST2026-04-24T15:21:15+5:302026-04-24T15:21:39+5:30

गेल्या १५ ते २० दिवसांत तरुणीकडून वेळाेवेळी पैसे घेतले. महापालिकेत नोकरी लावण्याबाबत आजींनी विचारणा केली. पैसे मिळाल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली

Pretending to be a police officer; Grandmother cheated of Rs 5 lakh by offering job in Municipal Corporation for grandson | पोलीस असल्याची बतावणी; नातीसाठी महापालिकेत नोकरीचे आमिष, आजींची तब्बल ५ लाखांची फसवणूक

पोलीस असल्याची बतावणी; नातीसाठी महापालिकेत नोकरीचे आमिष, आजींची तब्बल ५ लाखांची फसवणूक

पुणे : पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी एका जणाविरोधात खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत तरुणीची आजी लता अरुण साळुंके (वय ६०, रा. गोल्डन चौक, चाकण) यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, केतन दादासाहेब साळुंके (वय ४०, रा. एमआयटी महाविद्यालयासमोर, लोणी काळभोर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लता साळुंके यांच्याकडे पोलिस असल्याची बतावणी केली होती. पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे त्याने सांगितले होते. फिर्यादी साळुंके यांच्या नातीला महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागात नोकरीला लावण्याचे आमिष त्याने दाखवले. खराडी भागातील एका हॉटेलजवळ आरोपीने त्यांची भेट घेतली. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत त्यांच्याकडून वेळाेवेळी पैसे घेतले. महापालिकेत नोकरी लावण्याबाबत त्यांनी विचारणा केली. पैसे मिळाल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घुले करत आहेत.

Web Title : पुणे: नौकरी के वादे से दादी के साथ ₹5 लाख की धोखाधड़ी।

Web Summary : पुणे में एक महिला को पुलिस अधिकारी बताकर एक आदमी ने ₹5 लाख की ठगी की। उसने उसकी पोती को पुणे नगर निगम में नौकरी दिलाने का वादा किया था। खराडी पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Pune: Grandma duped of ₹5 lakh with job promise.

Web Summary : A Pune woman was cheated of ₹5 lakh by a man posing as a police officer. He promised her granddaughter a job in the Pune Municipal Corporation. Kharadi police have registered a case against the accused.