पुण्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ११ आरोपी जेरबंद, ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:39 IST2026-04-27T11:38:44+5:302026-04-27T11:39:16+5:30

अटक केलेल्या आरोपींकडून तपास करताना काही आरोपी राजस्थान येथून एम.डी. अमली पदार्थ आणत असल्याची माहिती समोर आली आहे

Police take major action against drugs in Pune; 11 accused arrested, goods worth Rs 48 lakh seized | पुण्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ११ आरोपी जेरबंद, ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ११ आरोपी जेरबंद, ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार परिमंडळ ७ अंतर्गत विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथक तयार करून ही मोहीम राबवण्यात आली.

८ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान राबवलेल्या या मोहिमेत वाघोली, लोणीकंद, लोहेगाव विमानतळ, चंदननगर आणि खराडी परिसरात छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान एम.डी. (मेफेड्रॉन) आणि गांजाची विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले.

या मोहिमेत पोलिसांनी एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून तपास करताना काही आरोपी राजस्थान येथून एम.डी. अमली पदार्थ आणत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास करत राजस्थानपर्यंत धाड टाकून आणखी संशयितांचा शोध घेतला. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी सुमारे ४८,६६,२५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २६८.११ ग्रॅम एम.डी., ४८२ ग्रॅम गांजा आणि २६० ग्रॅम पावडर (एम.डी. मिश्रित पदार्थ) यांचा समावेश आहे.

Web Title : पुणे पुलिस ने ड्रग रैकेट का भंडाफोड़ किया, 11 गिरफ्तार, ₹48 लाख जब्त

Web Summary : पुणे पुलिस ने नशीली दवाओं के तस्करी पर कार्रवाई करते हुए 11 लोगों को गिरफ्तार किया और ₹48.66 लाख की ड्रग्स जब्त की, जिसमें एमडी और गांजा शामिल है। पुणे और राजस्थान में छापेमारी से एक ड्रग आपूर्ति नेटवर्क का पता चला। शहर में बढ़ते ड्रग मामलों को रोकने के उद्देश्य से अभियान चलाया गया।

Web Title : Pune Police Bust Drug Racket, Arrest 11, Seize ₹48 Lakh

Web Summary : Pune police cracked down on drug trafficking, arresting 11 individuals and seizing ₹48.66 lakh worth of drugs, including MD and Ganja. Raids across Pune and Rajasthan revealed a drug supply network. The operation aimed to curb rising drug cases in the city.