तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:13 IST2026-04-27T11:12:01+5:302026-04-27T11:13:08+5:30

Education News: तब्बल २५ एकर परिसरात पसरलेला विस्तीर्ण कॅम्पस, सुमारे २८९ कोटी रुपये खर्च करून बांधलेली भव्य इमारत, सोबतच सर्व सोईसुविधा उपलब्ध असूनही उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील पंडित दीन दयाल उपाध्याय पुरातत्त्व संस्थेमध्ये विद्यार्थ्यांविना शुकशुकाट दिसून येत आहे.

A campus of 25 acres, costing 289 crores, inaugurated by Modi, but only 15 students in this institution | तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 

तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 

तब्बल २५ एकर परिसरात पसरलेला विस्तीर्ण कॅम्पस, सुमारे २८९ कोटी रुपये खर्च करून बांधलेली भव्य इमारत, सोबतच सर्व सोईसुविधा उपलब्ध असूनही उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील पंडित दीन दयाल उपाध्याय पुरातत्त्व संस्थेमध्ये विद्यार्थ्यांविना शुकशुकाट दिसून येत आहे. एवढ्या आधुनिक सोईसुविधा असूनही सध्या इथे केवळ पंधराच विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भातील वृत्त आज तक या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.

या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार २०१६ साली तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या संस्थेची पायाभरणी केली होती. तर ही संस्था पुरातत्व क्षेत्रातील अभ्यासाचं एक प्रमुख केंद्र बनेल, हा दृष्टीकोन समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये या संस्थेचं उद्घाटन केलं होतं. मात्र आता ७ वर्षे उलटत आली तरी ही संस्था अपेक्षित झेप घेऊ शकली नाही. तसेच एवढा प्रचंड खर्च करून उभारलेल्या या संस्थेत आज विद्यार्थ्यांअभावी निरव शांतता दिसून येते. २५ एकर परिसरात पसरलेल्या या संस्थेच्या आवारात प्रशस्त रस्ते, उंच इमारती, उत्तम रंगकाम केलेल्या भिंती आणि इतर सोईसुविधा उपलब्ध केल्या गेलेल्या आहेत. मात्र एवढं सारं असूनही कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची वानवा आहे.

येथे शिकवणी वर्ग, लॅब, वाचनालय सारं काही आहे. मात्र त्यातील लॅब आणि लायब्ररही ही बहुतांश वेळा बंद असते, असे येथील सुरक्षा रक्षकाने सांगितले. वरच्या मजल्यावरील बहुतांश कार्यालये बंद होती. तसेच येथील साधन सामुग्री धूळखात पडली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे येथे शिक्षण घेणाऱ्यांना शिकवण्यासाठी नियमित शिक्षकवर्ग नाही आहे. तर एएसआयचे अधिकारी आणि तज्ज्ञ हे येथे गेस्ट लेक्चरर म्हणून येतात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. मात्र .येथे क्लासरूम टिचिंग ऐवजी फिल्ड ट्रेनिंगवर भर दिला जातो, अशीही माहिती समोर आली आहे. 

येथील शिक्षणाबाबत मिळालेली महत्त्वाची माहिती म्हणजे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुठलाही निश्चित असा अभ्यासक्रम नाही आहे. तर सारं शिक्षण हे प्रॅक्टिकल, एक्पोजर आणि फिल्डवर्कवर आधारित असतं. येथील विद्यार्थी ६० दिवसांच्या फिल्ड व्हिजिटवर जातात आणि त्यावर आधारित अहवाल लिहितात. मात्र निश्चित अभ्यासक्रमाविना परीक्षा कशी होते आणि विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं होतं, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र एवढं सारं असूनही येथे केवळ १५ विद्यार्थी शिकत आहेत. यातील १० विद्यार्थी आणि ५ विद्यार्थिनींचा समावेश आहे. तसेच २५ एकरचा परिसर आणि  एक हजार जागांची मर्यादा असलेल्या ऑडिटोरियमचा विचार करता येथील विद्यार्थी संख्या ही नगण्य आहे. एवढंच नाही तर येथे विविध कार्यालये असूनही सुरक्षा रक्षक वगळता कर्मचाऱ्यांची फारशी वर्दळ दिसून येत नाही.
 

Web Title : विशाल परिसर, मोदी ने किया उद्घाटन, पर केवल 15 छात्र पढ़ते हैं।

Web Summary : उत्तर प्रदेश के पंडित दीन दयाल उपाध्याय संस्थान, ₹289 करोड़ से निर्मित, में व्यापक सुविधाओं के बावजूद केवल 15 छात्र हैं। 2019 में उद्घाटन किया गया, इसमें एक निश्चित पाठ्यक्रम और स्थायी शिक्षकों की कमी है, जो फील्ड प्रशिक्षण और अतिथि व्याख्याताओं पर निर्भर है। संस्थान कम छात्र संख्या और अप्रयुक्त संसाधनों के लिए आलोचना का सामना कर रहा है।

Web Title : Huge campus, Modi inaugurated, but only 15 students study there.

Web Summary : UP's Pandit Deen Dayal Upadhyaya Institute, built with ₹289 crore, has only 15 students despite vast facilities. Inaugurated in 2019, it lacks a fixed curriculum and permanent teachers, relying on field training and guest lecturers. The institution faces criticism for low student numbers and underutilized resources.