रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:23 IST2026-04-27T12:21:40+5:302026-04-27T12:23:25+5:30

ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यापासून तासाभरात हजाराहून जास्त लोकांनी 'राजा शिवाजी'चं तिकिट बुक केलंय. प्रेक्षकांचा ॲडव्हान्स बुकींगमध्येच भरघोस प्रतिसाद बघायला मिळत आहे

Advance bookings for the film Raja Shivaji Riteish Deshmukh started book my show | रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’च्या प्रदर्शनाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असताना आता चित्रपटाच्या मराठी आवृत्तीचे ॲडव्हान्स बुकिंग अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे. या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, दमदार कलाकारांची फळी आणि भव्य निर्मितीमूल्यांमुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे. विशेष म्हणजे तासाभरात 'राजा शिवाजी’ चित्रपटासाठी तब्बल हजाराहून जास्त लोकांनी बुकींग केलं आहे.

बुक माय शो या ऑनलाईन तिकिट वेबसाईटवर  ‘राजा शिवाजी’च्या ऑनलाईन तिकिट बूकिंगला सुरुवात होताच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत ‘राजा शिवाजी’ हा दमदार ओपनिंग कमाई करणारा चित्रपट ठरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाची धुरा सांभाळली असून त्यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवचरित्रावर आधारित असलेला हा चित्रपट केवळ ऐतिहासिक कथा मांडत नाही, तर स्वाभिमान, शौर्य आणि नेतृत्वाची प्रेरणादायी गाथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करतो. 

‘राजा शिवाजी’मध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची प्रभावी उपस्थिती पाहायला मिळणार आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या कलाकारांचा भव्य संच या चित्रपटाला अधिक मोठेपणा प्रदान करतो. या कलाकारांच्या दमदार अभिनयासोबतच भव्य सेट्स, उत्कृष्ट तांत्रिक मांडणी आणि प्रभावी दृश्यरचना यामुळे चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Web Title : रितेश देशमुख की 'राजा शिवाजी' की एडवांस बुकिंग शुरू, जबरदस्त प्रतिक्रिया

Web Summary : रितेश देशमुख की ऐतिहासिक फिल्म 'राजा शिवाजी' की एडवांस बुकिंग शुरू हो गई है, जिसे जबरदस्त प्रतिक्रिया मिल रही है। फिल्म में शानदार कलाकार, भव्य निर्माण और वीरता की प्रेरणादायक कहानी है। 1 मई, 2026 को मराठी और हिंदी में रिलीज।

Web Title : Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' Advance Booking Starts, Overwhelming Response

Web Summary : Advance booking for Riteish Deshmukh's historical film 'Raja Shivaji' has begun, receiving an overwhelming response. The film boasts a stellar cast, grand production, and narrates an inspiring tale of valor. Releasing May 1, 2026, in Marathi and Hindi.