आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:59 IST2026-04-27T11:59:30+5:302026-04-27T11:59:53+5:30
Rajya Sabha News: राघव चड्डा यांच्यासह सात खासदारांनी आम आदमी पक्षातून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करत भाजपामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याने आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला होता. तसेच या खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाबाबत राज्यसभा सभापती काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश
राघव चड्डा यांच्यासह सात खासदारांनी आम आदमी पक्षातून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करत भाजपामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याने आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला होता. तसेच या खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाबाबत राज्यसभा सभापती काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, आज राघव चड्डांसह इतर सात खासदारांच्या गटाच्या भाजपामधील विलिनीकरणाला राज्यसभा सभापतींनी मान्यता दिली आहे.
राज्यसभेच्या सभापतींनी घेतलेल्या या निर्णयानंतर राज्यसभा सचिवालयाकडून एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं असून, त्यामध्ये या सात खासदारांची नावं भाजपा खासदारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. दरम्यान, राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या सात खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता राज्यसभेतील भाजपाच्या खासदारांची संख्या वाढून ११३ एवढी झाली आहे. यामध्ये राष्ट्रपती नियुक्त ५ खासदारांचाही समावेश आहे.
भाजपामध्ये दाखल झालेल्या आम आदमी पक्षाच्या सात खासदारांमध्ये राघव चड्डा, अशोक मित्तल, हरभजन सिंह, संदीप पाठक, विक्रमजित सिंह साहनी, स्वाती मालीवाल आणि राजिंदर गुप्ता यांचा समावेश आहे.