शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना पोलिसांची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 00:33 IST

कोणत्याही प्रकारची घोषणा, रॅली अथवा ध्वज संचलन अथवा आरतीचे आयोजन करु नये अशा प्रकारच्या नोटीस पोलिसांनी बजावल्या आहेत.

ठळक मुद्दे पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांचा रूट मार्चशहरातील संवेदनशील भागात पोलिसांकडून बंदोबस्त तैनात

पिंपरी : अयोध्या येथे राममंदिराचे भूमिपूजन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांना तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काही जणांना नोटीस बजावल्या आहेत. राममंदिर भूमिपूजनानिमित्त भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भोसरीचेआमदार महेश लांडगे यांनादेखील अशीच नोटीस पोलिसांनी बजावली आहे.

अयोध्या येथे राममंदिराचे बुधवारी भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागात पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मंगळवारी शहरात विविध भागात रुट मार्च करून शांततेसाठी पोलिसांनी आवाहन केले. कोरोना महामारीमुळे संचारबंदी व जमावबंदीचे आदेश असून पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी आहे. या आदेशाचे देखील पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.कोणत्याही प्रकारची घोषणा, रॅली अथवा ध्वज संचलन करण्यात येऊ नये, तसेच मंदिरांमध्ये आरतीचे आयोजन करु नये, अशा प्रकारच्या नोटीस पोलिसांनी बजावल्या आहेत. कोणाच्याही भावना दुखावतील, अशी कृती करणार नसल्याचे हिंदुत्ववादी संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लाडू वाटपाचे आयोजन केले आहे. त्यामुळे एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या अनुषंगाने आपण ठिकाणी लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करणार आहात, अशी माहिती मिळाली आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लाडू वाटप करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे लाडू वाटप करू नये. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असे पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

प्रशासनाचा निषेध

पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर प्रशासनाचा निषेध केला जात आहे. प्रभू श्रीराम संपूर्ण देशाची अस्मिता आहे. पाचशे वर्षांनंतर त्यांचे होणारे मंदिर हा आम्हा देशवासीयांचा स्वाभिमान आहे. या मंगल प्रसंगी भूमिपूजन सोहळ्याच्या आनंदात प्रशासन आम्हाला सहभागी होऊ देत नसेल त्याचा विनम्रपणे निषेध करतो, असे संबंधित नोटीसवर नमूद करण्यात येऊन सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbhosariभोसरीMLAआमदारBJPभाजपाAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर