शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

By admin | Updated: September 8, 2014 04:00 IST

गणेश विसर्जनासाठी शहर पोलीस दलाने कंबर कसली असून, घातपाती कारवायांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने चोख उपाययोजना केल्या आहेत

पुणे : गणेश विसर्जनासाठी शहर पोलीस दलाने कंबर कसली असून, घातपाती कारवायांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने चोख उपाययोजना केल्या आहेत. लक्ष्मी रस्त्यासह मध्यवस्तीतील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अकरा हजार पोलिसांचे मनुष्यबळ रस्त्यांवर खडा पहारा देणार आहे. यासोबतच सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ संपूर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवून असणार आहे.विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकूण ४ हजार ३४ नोंदणीकृत मंडळे आहेत. या मंडळांपैकी २२९ मंडळे लक्ष्मी रस्त्यावरून, १६१ मंडळे टिळक रस्त्यावरून, १३४ मंडळे कुमठेकर रस्त्यावरून, तर १२३ मंडळे केळकर रस्त्यावरून मिरवणूक काढतात. गेल्या वर्षी जवळपास २५ तास चाललेली मिरवणूक यंदा त्यापेक्षा कमी वेळात संपवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासाठी गेल्या वर्षी मंडळांना आधीच रांगेत लावून घेण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर पोलिसांनी स्वत: जागोजाग सीसीटीव्ही बसविले आहेत, तर खासगी आस्थापनांच्या सीसीटीव्हींचाही पोलिसांना उपयोग होणार असून, मंडळांनीही पोलिसांना सहकार्य करीत विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसवून घेतले आहेत. विसर्जन घाटांवर विशेष बंदोबस्त नेमण्यात आला असून, सीसीटीव्ही, बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या टीम्स, जीवरक्षक, अग्निशामक दलाचे पथक, रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, विसर्जन मार्गांवरही ठिकाणे निश्चित करून तेथेही अत्यावश्यक सेवा देणारी वाहने उभी करण्यात येणार आहेत. महिलांनी मौल्यवान ऐवज, लहान मुले आणि वृद्धांनाही सांभाळावे, असे आवाहन पाठक यांनी केले आहे. गणेशोत्सवामध्ये महिला छेडछाड, चोरी, सोनसाखळी चोरी आदी प्रकार घडल्यास बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना तातडीने त्याची माहिती द्यावी. पोलिसांनी शहरामध्ये जागोजाग वाहन तपासणी सुरू केली आहे. ठिकठिकाणी वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. या टॉवर्सवर हत्यारबंद पोलिसांचा पहारा असणार आहे. दुबिर्णीद्वारे गर्दीतील टवाळ आणि भामट्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)