शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Pune railway station: गाड्यांची प्रतीक्षा संपणार...! पुणे स्टेशनला मिळणार ६ नवीन प्लॅटफॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 15:57 IST

- नवीन सहा प्लॅटफॉर्ममुळे गाड्यांची कोंडी फुटणार; ४४.०९ कोटींचा निधी मंजूर 

पुणे : पुणेरेल्वेस्थानकावरील प्रवाशांची वाढती गर्दी, नवीन गाड्यांची मागणी लक्षात घेऊन रेल्वेस्थानकाच्या विस्तारीकरण करण्यात येत आहे. सध्या असलेल्या सहा प्लॅटफॉर्ममध्ये आता आणखी नवीन सहा फलाटांची भर पडणार असून, आता ११ आणि १२ या दोन प्लॅटफॉर्मच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे पुणे रेल्वेस्थानकाची क्षमता दुप्पट होणार असून, गाड्यांची होणारी ‘आउटर’ची प्रतीक्षा आता संपणार आहे.

पुणे शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, जागेच्या उपलब्धतेअभावी आणि मर्यादित प्लॅटफॉर्ममुळे नवीन गाड्या सुरू करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे स्थानकाची पाहणी करून सहा नवीन फलाट वाढवण्याचे आदेश वर्षभरापूर्वी दिले होते. त्यानुसार रेल्वे विभागाने आराखडा तयार केला असून, या संपूर्ण प्रकल्पासाठी ४४.०९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म ९ ते १२ दरम्यान ४०० मीटर लांबीचे ‘कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म’ उभारले जाणार आहे. यामुळे प्रवाशांना ऊन आणि पावसाचा त्रास होणार नाही. प्रत्येक फलाटावर आधुनिक स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याचे १० वॉटर स्टँड्स आणि सर्व फलाटांना जोडणारे पादचारी पूल (एफओबी) उभारण्यात येणार आहेत. या विस्तारीकरणाचे काम पुढील एक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. 

‘आयलँड’ प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य :

हे सर्व नवीन सहा फलाट ‘आयलँड’ स्वरूपाचे असणार आहेत. यामध्ये एकाच प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूंना गाड्या लागू शकतील. यामुळे प्रवाशांना चढणे आणि उतरणे अत्यंत सोपे होईल. तसेच, प्रवाशांची गर्दी विभागली गेल्यामुळे प्लॅटफॉर्मवर होणारी चेंगराचेंगरी कमी होण्यास मदत होईल. पहिला टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक ११ आणि १२ चे काम सुरू केले आहे. यासाठी १५.३२ कोटी खर्च केले जाणार असून, ६०० मीटर लांब आणि १३ मीटर रुंद असे हे फलाट पुढील दोन महिन्यांत पूर्ण होतील. दुसऱ्या टप्प्यात प्लॅटफॉर्म ९ आणि १० साठी १८.३८ कोटी मंजूर झाले आहेत. हा ७५० मीटर लांबीचा सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म असेल, जिथे २४ डब्यांच्या रेल्वे सहज उभ्या राहू शकतील. तर तिसऱ्या टप्प्यात प्लॅटफॉर्म ७ आणि ८ साठी १०.३९ कोटींचा निधी असून, याची लांबी ६५० मीटर आणि रुंदी १० मीटर असणार आहे. 

रेल्वेस्थानकावरील दृष्टिक्षेप :

- एकूण नवीन प्लॅटफॉर्म : ६ (एकूण संख्या १२ होणार)

- प्रकल्पाचा एकूण खर्च : ४४.०९ कोटी रुपये

- सर्वांत लांब प्लॅटफॉर्म : ७५० मीटर (प्लॅटफॉर्म क्र. ९ आणि १०)

- प्रवाशांना फायदा : २४ डब्यांच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सहज थांबणार

- ४०० मीटरचे शेड, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर २ स्वच्छतागृहे आणि १० वॉटर स्टँड्स

रेल्वेस्थानकावरील विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. शिवाय प्लॅटफॉर्मची संख्या वाढल्याने नव्या गाड्या सुरू होतील.  - हेमंतकुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Station to Get Six New Platforms, Ending Train Delays

Web Summary : Pune Railway Station is expanding with six new platforms to ease congestion and accommodate more trains. The project, costing ₹44.09 crore, includes covered platforms, modern facilities, and island platforms for easier boarding. Completion is expected within a year, benefiting passengers with less waiting time.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वे