शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

RTE Admission: आरटीई पडताळणीचा प्रचंड मनस्ताप; आकुर्डीत पालकांची प्रचंड गर्दी, महिलांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 11:41 IST

RTE Admission - महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार : कागदपत्र पडताळणीसाठी मुदतवाढीची मागणी

पिंपरी : आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिका शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका बुधवारी (दि. १५) पालकांना बसला आहे. आकुर्डीतील उन्नत शहर साधन केंद्रात अधिकारी कर्मचाऱ्यांअभावी गोंधळ उडाला. भर उन्हात शेकडो पालक उभे होते, त्यामुळे संताप अनावर झाला. गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.

आरटीईची सोडत काढल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीस सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्षात केंद्रावर आज अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नव्हते. भर उन्हात पालक ताटकळत उभे होते. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. 

आकुर्डी केंद्रावर सुरक्षारक्षकांकडून नावनोंदणी सुरू होती. कागदपत्र तपासणीसाठी जबाबदार अधिकारी नसल्याने पालकांचे प्रश्न आणि शंकांचे समाधान होऊ शकले नाही. आम्हाला टोकन द्या, कागदपत्र तपासा, आम्ही हेलपाटेच मारायचे का? अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या. यावेळी सुरक्षा रक्षक आणि पालकांमध्ये बाचाबाचीही झाली.

पालकांच्या रोषापुढे शिक्षणाधिकारी हतबल

दुपारी सुमारे एक वाजता महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी  संगीता बांगर आणि लिपिक प्रिन्स सिंग यांनी केंद्रात येऊन कागदपत्र स्वीकारण्यास सुरुवात केली. गोंगाट आणि प्रचंड गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती. शिक्षणाधिकारी बांगर यांनी अत्यल्प मनुष्यबळात परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करीत पालकांना टोकन वाटप सुरू केले. मात्र, गर्दीमुळे चेंगराचेंगरीही झाली. महिला पालकांचे हाल झाले. काहींना रडू कोसळले. दुपारी तीननंतर केंद्रातील पथक आल्यानंतर पालकांना टोकन देण्यासह कागदपत्र जमा केल्याने गर्दी कमी झाली. केंद्राबाहेर पालकांसह सोबत असलेल्या चिमुकल्यांचे पाण्यावाचून हाल झाले. तर केंद्रात कागदपत्र जमा करण्यासाठी स्टॅपर न मिळाल्याने पालकांची धावपळ उडाली होती.  

पिंपरी केंद्रातही गैरसोय

आकुर्डीप्रमाणेच पिंपरी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील केंद्रावरही अधिकारी अनुपस्थित असल्याने पालकांना दुपारी तीननंतर बोलावण्यात आले. हेलपाट्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली. दुपारी तीन नंतर टोकन वितरण व कागदपत्र स्वीकारण्यात आली. 

शासनाच्या पटपडताळणीचे मंगळवारी नियोजन केले. त्यानुसार बुधवारी आकुर्डी केंद्राचे पथक पटपडताळणीसाठी गेले आणि पालकांची गर्दी वाढली. केंद्रात गोंधळ उडाल्याचे समजताच स्वतः धाव घेत सुरक्षा रक्षकांसह काही पालकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी तीनला पथक आल्यानंतर एकूण ७५६ पालकांची कागदपत्र जमा केली. सायंकाळी सातपर्यंत २०० कागदपत्रांची पडताळणी केली. - संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग महापालिका   

आरटीई पडताळणीसाठी केवळ दहा दिवसांची मुदत आहे. त्यात सलग सुट्याही आल्याने प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का, याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. कागदपत्र जमा केल्याची पोहोचही दिली जात नसल्याची तक्रार आहे. शासनाने पडताळणी प्रक्रियेस मुदतवाढ द्यावी.  - मुकुंद कीर्दत, आप पालक युनियन 

English
हिंदी सारांश
Web Title : RTE Admission Chaos: Verification causes distress; parents crowd Akurdi center.

Web Summary : RTE admission verification caused chaos in Akurdi due to staff shortages. Parents faced long waits and overcrowding. Officials struggled to manage the situation; Pimpri center faced similar issues.
टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड