शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी म्हणतात, इंधन वाचवा, पण उद्योगनगरीत खासगी वाहने सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 14:02 IST

- सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने दुचाकी-चारचाकीकडे वाढता कल : १७.५० लाख वाहनांमुळे इंधनाचा मुबलक वापर; वाहतूककोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न गंभीर

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले असले, तरी पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक शहरांमध्ये त्याची अंमलबजावणी करणे मोठे आव्हान ठरणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरच अवलंबून राहावे लागत आहे. शहरातील वाहनसंख्या झपाट्याने वाढत असून, वाहतूककोंडी, प्रदूषण आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे.

जागतिक नकाशावर पिंपरी-चिंचवडची औद्योगिकनगरी म्हणून ओळख आहे. शहरात सुमारे १२ हजार लहान-मोठे उद्योग आणि कंपन्या कार्यरत आहेत. शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात पोहोचली असून, वाहनांची संख्या तब्बल १७.५० लाखांवर गेली आहे. रोजगाराच्या निमित्ताने दररोज हजारो कर्मचारी, कामगार आणि व्यावसायिक शहरात ये-जा करतात. पीमपी बस, मेट्रो आणि रेल्वे अशी दळणवळणाची साधने सक्षम नसल्याने खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा वापर केला जात आहे. परिणामी शहरातील रस्ते प्रशस्त असूनही प्रमुख रस्त्यांवर दिवसभर वाहतूककोंडीचे चित्र आहे.

पेट्रोलपंप संख्या

पुणे विभाग : ३५०
पिंपरी-चिंचवड : १५०

----

महिन्याचा इंधन वापर

पेट्रोल : १० कोटी लीटर
डिझेल : १७ कोटी लीटर
---
 
पीएमपी बससेवेचे जाळे अपुरे

शहरातील पीएमपीएमएल बससेवा नागरिकांच्या गरजेनुसार सक्षम नसल्याची तक्रार आहे. अनेक वाकड, पुनावळे, चिखली, चऱ्होली, बोपखेल, किवळे या भागांत बसफेऱ्या कमी आहेत, तर नव्याने विकसित झालेल्या परिसरांत बससेवा अद्याप पोहोचलेली नाही. बसच्या वेळा, गर्दी आणि अपुऱ्या सुविधा यामुळे नागरिक खासगी वाहनांना प्राधान्य देत आहेत.

 
मेट्रो आणि लोकल सेवेलाही मर्यादा

शहरात मेट्रो सेवा सुरू असली, तरी सध्या पिंपरी ते स्वारगेट एकाच मार्गावर मेट्रो धावत आहे. शहराच्या सर्व भागांना मेट्रोचे जाळे जोडले गेलेले नाही. रेल्वेच्या लोकल फेऱ्याही मर्यादित आहे. दुपारी बारा ते तीन या वेळेत लोकल नाही. त्यामुळे प्रवाशांना त्याचा पुरेसा फायदा होत नाही. त्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर वाढत आहे.

सार्वजनिक पार्किंगचा गंभीर प्रश्न

वाहनसंख्या वाढल्यामुळे शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. प्रमुख चौक, व्यापारी संकुले आणि निवासी भागांमध्ये सार्वजनिक पार्किंगची सुविधा अपुरी पडत आहे. मेट्रोसाठी येणारे नोकरदार वर्ग रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करत आहेत. त्यामुळे कोंडीत अधिक भर पडत आहे. मेट्रोने सार्वजनिक वाहनतळ विकसित केलेले नाही. त्यामुळे वाहने रस्त्याच्या कडेला उभी केलेली असतात.

इलेक्ट्रिक वाहनांकडे कल कमी

पर्यावरणपूरक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा प्रचार होत असला तरी शहरात त्याचा वापर मर्यादित आहे. चार्जिंग स्टेशनची अपुरी संख्या, वाहनांच्या वाढलेल्या किमती आणि सुविधा नसल्याने अनेक नागरिक अजूनही पारंपरिक इंधनावरील वाहनांनाच पसंती देत आहेत.

इंधन विक्रीवर परिमाण नाही

पुणे विभागात ३५० पेट्रोलपंप असून, पिंपरी-चिंचवडमध्ये १५० पंप आहेत. महिन्याला १० कोटी लीटर पेट्रोल आणि १७ कोटी लीटर डिजेल विक्री होते. अद्याप इंधन विक्रीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे विक्रेत्याचे मत आहे. इंधन बचतीसाठी केवळ आवाहन पुरेसे ठरणार नाही. त्यासाठी पीएमपीएमएल बससेवेचे जाळे विस्तारण्याबरोबरच मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, सार्वजनिक पार्किंग प्रकल्प आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविणे आवश्यक आहे, असे मत नोकरदार वर्गाने व्यक्त केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fuel conservation call ineffective as private vehicles surge in Pimpri-Chinchwad.

Web Summary : Despite PM's fuel saving appeal, Pimpri-Chinchwad sees rising private vehicle use due to inadequate public transport. Traffic congestion, pollution, and parking issues worsen as vehicle numbers soar, hindering fuel conservation efforts.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रोPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदी