शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
2
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
5
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
6
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
7
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
8
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
9
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
10
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
11
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
13
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
14
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
15
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
16
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
17
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
18
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
19
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
20
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 14:37 IST

Tata Altroz CNG AMT Launched in India: टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपली लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोझचे सीएनजी ऑटोमॅटिक मॉडेल अधिकृतपणे लॉन्च केले.

टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपली लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोझचे सीएनजी ऑटोमॅटिक मॉडेल अधिकृतपणे लॉन्च केले. या कारची सुरुवातीची किंमत ८.७० लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. टाटा अल्ट्रोझ ही या सेगमेंटमधील पहिली कार ठरली आहे, ज्यामध्ये सीएनजी इंजिनसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. टाटाच्या टियागो, टिगोर आणि पंचमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो.

टाटा अल्ट्रोझ इंजिन आणि कार्यक्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, यात यात १.२ लीटर, ३-सिलेंडर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन मिळत आहे, जे ७२ पीएचपीची पॉवर आणि १०३ एनएमचा टॉर्क जनरेट करते. शिवाय या कारमध्ये ५-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. अल्ट्रोझ सीएनजीमध्ये टाटाचे प्रसिद्ध ट्विन सिलेंडर टेक्नोलॉजी वापरण्यात आलीआहे. यामुळे सीएनजी असूनही ग्राहकांना २१० लीटरची मोठी डिकी मिळते, जी सामान्य सीएनजी कारच्या तुलनेत अधिक सोयीस्कर आहे.

टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक: किंमत (Tata Altroz CNG AMT Price)

टाटाने ही कार टाटा अल्ट्रोझ प्युअर,  टाटा अल्ट्रोझ प्युअर एस, टाटा अल्ट्रोझ क्रेटिव्ह, टाटा अल्ट्रोज क्रेटिव्ह एस आणि टाटा अल्ट्रोझ अकांप्लिश्ड अशा एकूण ५ व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. टाटा अल्ट्रोझ प्युअरची किंमत ८.७० लाख रुपये आहे. तर,  टाटा अल्ट्रोझ प्युअर एसची किंमत ९ लाख रुपये आहे. तर, टाटा अल्ट्रोझ क्रेटिव्ह, टाटा अल्ट्रोज क्रेटिव्ह एस आणि टाटा अल्ट्रोझ अकांप्लिश्ड या कारची किंमत अनुक्रमे ९ लाख ५७ हजार रुपये, ९.८२ लाख रुपये आणि १० लाख ७७ हजार रुपये इतकी आहे.

टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक: आरामदायी फीचर्स

या कारमध्ये ग्राहकांना अनेक आकर्षित फिचर्स देण्यात आली आहेत. ही कार सीनजी मोडवर सुरू करता येऊ शकते. सुरक्षिततेसाठी यात सिंगल ईसीयू आणि थर्मल प्रोटेक्शन देण्यात आले आहे. सीएनजी व्यतिरिक्त, अल्ट्रोझ पेट्रोल (मॅन्युअल आणि डीसीए) आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्येही उपलब्ध आहे. ज्यांना शहरात चालवण्यासाठी आरामदायी आणि इंधन बचतीसाठी सीएनजी कार हवी आहे, त्यांच्यासाठी अल्ट्रोझ सीएनजी एएमटी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

ऑटोमॅटिक टेक्नोलॉजीचा नेमका फायदा काय?

सीएनजी ऑटोमॅटिक कार सध्या भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय होत आहेत. साधारणपणे सीएनजी कारमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स असतो, ज्यामुळे ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच दाबावा लागतो. पण ऑटोमॅटिक टेक्नोलॉजीमुळे तुम्हाला वारंवार क्लच दाबण्याची किंवा गिअर बदलण्याची गरज पडत नाही. पेट्रोल ऑटोमॅटिक कारच्या तुलनेत सीएनजी ऑटोमॅटिक कार चालवण्याचा खर्च खूपच कमी असतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Altroz CNG AMT Launched: Convenience and Efficiency Combined!

Web Summary : Tata Motors launched the Altroz CNG AMT, the first in its segment. It has a 1.2L engine, AMT gearbox, and twin-cylinder CNG tech, offering a spacious boot. Available in five variants, it provides convenience, safety, and fuel efficiency for city driving.
टॅग्स :carकारTataटाटाCar Reviewकार रिव्ह्यू