1 / 5पश्चिम आशियातील तणाव, डॉलरमधील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढता कल यामुळे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची सोन्याची आयात २४ टक्क्यांनी वाढून ७१.९८ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. 2 / 5विशेष म्हणजे, सोन्याची प्रत्यक्ष मात्रा घटली असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील गगनाला भिडलेल्या किमतीमुळे भारताला यासाठी मोठी परकीय चलन साठा खर्च करावा लागला आहे.3 / 5सोन्याचे प्रतिकिलो दर २०२४-२५ मधील ७६,६१७ डॉलर वरून २०२५-२६ मध्ये जवळपास ९९,८२५ डॉलर इतके वाढले. त्यामुळे कमी प्रमाणात आयात होऊनही एकूण आयातमूल्य झपाट्याने वाढले.4 / 5दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर दीड लाख रुपयांच्या आसपास पोहोचल्याने सामान्य ग्राहकांवरही ताण वाढला आहे.5 / 5आर्थिक संशोधन संस्था जीटीआरआयने भारत-यूएई मुक्त व्यापार कराराचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. शुल्क कपातीनंतर दुबईमार्गे भारतात येणाऱ्या सोन्यावर प्रभावी शुल्क केवळ ५ टक्क्यांपर्यंत आले आहे.