Join us
Daily Top 2Weekly Top 5

पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान

Pat Cummins GT vs SRH IPL 2026: कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा लाजिरवाणा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:43 IST

Open in App

Pat Cummins Fined GT vs SRH IPL 2026: अहमदाबादमध्ये मंगळवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवला. हा सामना अवघ्या ३४.५ षटकांतच संपला. पण हैदराबादच्या पराभवापेक्षाही हैदराबादसाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांचा कर्णधार पॅट कमिन्सवर बीसीसीआयने (BCCI) कारवाई केली. या कारवाईमुळे त्याचे नाव हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह नकोशा यादीत जोडले गेले.


पॅट कमिन्सवर नेमकी कारवाई काय?

निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे (Slow Over-rate) आयपीएलच्या आचारसंहितेनुसार पॅट कमिन्सला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सनरायझर्स हैदराबादचा या हंगामातील हा पहिलाच गुन्हा असल्याने केवळ कर्णधाराला दंड करण्यात आला आहे. जर दुसऱ्यांदा अशी चूक झाली, तर दंडाची रक्कम वाढून संघातील इतर खेळाडूंनाही दंड होऊ शकतो. या दंडामुळे पॅट कमिन्स आता आयपीएल २०२६ मधील अशा कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे ज्यांना स्लो ओव्हर रेटमुळे दंड सोसावा लागला आहे. यापूर्वी हार्दिक पांड्या (MI), श्रेयस अय्यर (PBKS), शुभमन गिल (GT) आणि ऋतुराज गायकवाड (CSK) यांनाही अशाच प्रकारे दंड झाला आहे.


सामन्यातही पॅट कमिन्सचा संघ 'फ्लॉप'

गुजरातने प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शन (६१) आणि वॉशिंग्टन सुंदर (५०) यांच्या खेळीच्या जोरावर १६८ धावा केल्या होत्या. विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य असलेल्या हैदराबादचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. संपूर्ण संघ अवघ्या ८६ धावांत गारद झाला. आयपीएलच्या इतिहासातील हैदराबादची ही निचांकी धावसंख्या ठरली. ८२ धावांनी मिळालेला हा पराभव हैदराबादच्या नेट रनरेटवर (NRR) मोठा परिणाम करणारा ठरला. दरम्यान, या कारवाईमुळे पॅट कमिन्स आणि हैदराबाद संघाला आगामी सामन्यांमध्ये रणनीतीसोबतच वेळेचे व्यवस्थापन करण्याकडेही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pat Cummins Fined: Joins 'Unwanted' List with Hardik, Shreyas After Slow Over-Rate

Web Summary : Pat Cummins faced BCCI action for slow over-rate, fined ₹12 lakhs. Cummins joins list of captains penalized for the same offense this IPL season. SRH lost to GT in the said match.
टॅग्स :आयपीएल २०२६सनरायझर्स हैदराबादबीसीसीआयश्रेयस अय्यरहार्दिक पांड्या