शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्र आळंदीत खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत पुन्हा लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:56 IST

तीर्थक्षेत्र आळंदीत अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीत पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देहू फाट्याजवळील एका खाजगी संस्थेत हा प्रकार घडला असून, दिघी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे.  गेल्या काही महिन्यांत आळंदीतील खाजगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी दोन अल्पवयीन मुलांवर पाहुण्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. तसेच एका महाराजाकडून तेरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकारही समोर आला होता. या वाढत्या घटनांमुळे आळंदीची प्रतिष्ठा डागळली असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.  या घटनांच्या पार्श्वभूमीवर आळंदीकरांनी एकत्र येत ‘सर्व खाजगी वारकरी शिक्षण संस्था बंद कराव्यात’ असा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ४८ तासांत अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर कारवाईचे आदेश दिले होते. प्रशासनाने विशेष पथकाद्वारे सर्वेक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला असला, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.  खाजगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ‘या संस्थांवर तातडीने कठोर कारवाई करावी’ अशी मागणी आता जोर धरत आहे. प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक