शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाटणला ४१ जणांना अतिसाराची लागण

By admin | Updated: May 29, 2014 04:51 IST

पाटण (ता. आंबेगाव) येथील ४१ आदिवासी ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली आहे. एकाच वेळी गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात जुलाब व उलट्यांची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे

डिंंभे : पाटण (ता. आंबेगाव) येथील ४१ आदिवासी ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली आहे. एकाच वेळी गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात जुलाब व उलट्यांची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या घटनेने प्रशासनही खडबडून जागे झाले असून आरोग्य विभागाची तीन पथके परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी काम करत आहेत. आंबेगावचे तहसीलदार बी. जे. गोरे नियंत्रण ठेवून असून परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेगाव तालुक्यात आदिवासी भागातील पाटण गावात मंगळवारी (दि. २७) अतिसाराचे तीन रुग्ण तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. गावातील अधिक लोकांनाही जुलाब, उलट्या होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी शारदा मोरमारे यांनी दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तळेघर येथील आरोग्य केंद्रातील गोळ्या, औषधांचा साठा घेऊन तातडीने पाटण येथे गेले, त्या ठिकाणी रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता वरिष्ठांशी संपर्क साधून तातडीच्या सेवेची मागणी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या पथकाने येऊन रात्री २७ रुग्णांना येथील माजी सरपंच महादेव मावळे यांच्या घरातच दाखल करून सलाईन, आवश्यक इंजेक्शन व सर्व तातडीची औषधे, गोळ्या पुरवून प्रथम घरोघरी पाण्याची तपासणी केली. पाणीसाठा शुद्धीकरणासाठी टीसीएल टाकून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. मंगळवारी रात्री आठ वाजता अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिरीगोसावी, तहसीलदार बी. जे. गोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. बी. काळे यांच्यासह डिंंभे, तळेघर, महाळुंगे पडवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर व कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन उपचार सुरू करण्यात आले. रात्री २७ रुग्णांवर उपचार सुरू होते, तर आज दिवसभरात १४ रुग्णांमध्ये वाढ झाली. आज दुपारपर्यंत ४१ रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आरोग्य विभागाकढून सांगण्यात आले आहे. अतिसार या आजारात ताप, जुलाब व रक्ताचा अंश असलेल्या उलट्या होत असल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले होते. आज पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे, सदस्य सुभाष तळपे यांनी भेट दिली तसेच शिवसेनेचे जयसिंंग एरंडे, अमोल अंकुश, खंडू कोकणे, नितीन केंगले यांनी रुग्णांना फळेवाटप करून परिस्थितीचा आढावा घेतला. (वार्ताहर)